द्राक्षाच्या मागणीसह दरात सुधारणा

जास्त थंडी, अधिक आंबटपणामुळे द्राक्ष खाण्यास टाळत होतो. मात्र वाढते ऊन, त्यामुळे फळात आलेल्या गोडीमुळे द्राक्ष खाण्यासाठी नेत आहोत. - अजय सांगळे, ग्राहक गेल्या महिन्याभरात थंडीमुळे फुगवण थांबून साखर उतरण्यास अडचणी होत्या. व्यापाऱ्यांनीही या दरम्यान उत्पादकांची अडवणूक केली. मात्र आता साखर योग्य प्रमाणात उतरली आहे. मागणीही वाढत असल्याने व्यवहारासाठी घाई करणार नाही. इतर उत्पादकांनी सुद्धा घाई करू नये. आंबट माल न देता गोड माल द्यावा. मार्च महिन्यात चांगले भाव मिळण्याची शक्यता आहे. - भाऊसाहेब क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक, उगाव शिवडी, ता. निफाड सध्या चालू प्लॉट काढणीसाठी आला. तो व्यापाऱ्याला दिला आहे. पुढील टप्प्यातील बाग काढणीला आल्यानंतर योग्य भाव मिळेपर्यंत विकणार नाही. त्याची योग्य निगा ठेऊ. - चंद्रकांत बनकर, द्राक्ष उत्पादक, राजापूर, ता. दिंडोरी
द्राक्षाच्या मागणीसह दरात सुधारणा
द्राक्षाच्या मागणीसह दरात सुधारणा

नाशिक : महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात थंडी वाढली. द्राक्षात थोडा आंबटपणा होता. त्यामुळे स्थानिक व परराज्यीय बाजारात द्राक्षांची मागणी मंदावली. मात्र आता वाढलेल्या उन्हामुळे द्राक्षात गोडी येत असून बाजारात मागणी वाढली आहे. दरातही सुधारणा होत असल्याचे चित्र आहे.

 वाढलेल्या थंडीमुळे द्राक्षांची दिल्ली, गुजरात, पंजाब, हरियाना, राजस्थानातील मागणी मंदावली होती. यांसह स्थानिक बाजारपेठेतही परिणाम झाला होता. मात्र आता थंडी कमी झाली आहे. उत्पादक थॉमसन, माणिकचमन, आरके यांसह कलर व्हरायटीमध्ये शरद सीडलेस, क्रीमसन, जम्बो जातींची द्राक्षे काढणीसाठी येत आहेत. वाढत्या तापमानामुळे ग्राहकांची मागणी वाढत असून व्यापाऱ्यांची मनमानी थांबणार आहे.

गेल्या महिन्याभरात द्राक्ष उत्पादकांनी मोठा फटका सहन केला. मात्र मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भाव सुधारतील, असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी सध्या बाजारभावाबाबत सावधगिरीने पाऊले टाकत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com