Agriculture news in marathi Improvement of rates of green chillies, legumes, turmeric in Solapur | Agrowon

सोलापुरात हिरवी मिरची, वांगी, दोडक्याच्या दरांत सुधारणा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 जानेवारी 2020

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात हिरवी मिरची, वांगी, दोडक्याला चांगला उठाव मिळाला. त्यामुळे त्यांच्या दरात संपूर्ण सप्ताहभर सुधारणा राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात हिरवी मिरची, वांगी, दोडक्याला चांगला उठाव मिळाला. त्यामुळे त्यांच्या दरात संपूर्ण सप्ताहभर सुधारणा राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  

बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात रोज हिरव्या मिरचीची ४० ते ५० क्विंटल, वांग्यांची २० ते ३० क्विंटल आणि दोडक्याची १० ते १५ क्विंटल अशी आवक राहिली. ही सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. बाहेरील आवक कमीच होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १२०० रुपये, सरासरी १६०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपये, वांग्यांना किमान ५०० रुपये, सरासरी ११०० रुपये आणि सर्वाधिक २३०० रुपये, दोडक्यांना किमान १००० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला. 

ढोबळी मिरची, गवार यांनाही चांगला उठाव मिळाला. ढोबळी मिरचीची आवक ५० ते १०० क्विंटलपर्यंत रोज आवक राहिली. गवारीची आवक १० ते १२ क्विंटलपर्यंत राहिली. ढोबळ्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान ८०० रुपये, सरासरी ११०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये, तर गवारीला किमान ३००० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये, असा दर मिळाला. गेल्या काही आठवड्यापासून त्यांची आवक आणि मागणी यात काहीशी तफावत असल्याने दरातील किरकोळ चढ-उतार वगळता दर टिकून आहेत. 

भाज्यामध्ये मेथी, कोथिंबीर, शेपूचे दरही पुन्हा स्थिर राहिले. भाज्यांची आवक प्रत्येकी १० ते १५ हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ५०० ते ६०० रुपये, कोथिंबीर ३०० ते ४०० रुपये आणि शेपूला २५० ते ३०० रुपयापर्यंत दर 
मिळाला.

कांद्याच्या दरांत चढ-उतार

कांद्याच्या आवकेत या सप्ताहात पुन्हा वाढ झाली. त्यामुळे 
दरांत चढ-उतार राहिला. या सप्ताहात रोज २०० ते ३०० गाड्यांपर्यंत आवक राहिली. पण शनिवारी (ता. २५) सर्वाधिक ८०० गाड्यांपर्यंत आवक झाली. या हंगामातील एका दिवसातील ही सर्वाधिक आवक राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक ३२०० रुपये असा दर मिळाला. साधारण २०० ते ४०० रुपयांच्या फरकाने त्याच्यात चढ-उतार राहिला.

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा


इतर ताज्या घडामोडी
सरदारांच्या वंशजांकडून शिवछत्रपतींना ८५...पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला ‘जिजाऊ शहाजी...
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणेसंत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती,...
लक्षात घ्या चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्मजमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सीताफळातील बहार व्यवस्थापनफेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...