Agriculture news in Marathi, Improvement in rates of Green peas and carrots | Agrowon

गुलटेकडीत शेवगा, मटार, कैरीच्या दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 जुलै 2019

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ७) भाजीपाल्याची अवघी सुमारे १४० ट्रक आवक झाली होती. पावसाळा सुरू झाला तरी अद्याप खरिपाचे उत्पादन सुरू झालेले नसल्याने विविध भाजीपाल्यांची आवक कमीच आहे. परिणामी शेवगा, मटार, कैरीच्या दरात वाढ झाली; तर पालेभाज्यांचे वाढलेले दर कायम असून, कोथिंबिरीला शेकड्याला ५ हजार रुपये दर होते.  

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ७) भाजीपाल्याची अवघी सुमारे १४० ट्रक आवक झाली होती. पावसाळा सुरू झाला तरी अद्याप खरिपाचे उत्पादन सुरू झालेले नसल्याने विविध भाजीपाल्यांची आवक कमीच आहे. परिणामी शेवगा, मटार, कैरीच्या दरात वाढ झाली; तर पालेभाज्यांचे वाढलेले दर कायम असून, कोथिंबिरीला शेकड्याला ५ हजार रुपये दर होते.  

विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, हिमाचल प्रदेशातून अवघी सुमारे ५० गोणी मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून ५ ट्रक कोबी, कर्नाटकमधून तोतापुरी कैरी सुमारे ४ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ३ टेम्पो, इंदूर येथून गाजर सुमारे ७ टेम्पो, कर्नाटकमधून घेवडा सुमारे ३ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी; तर आग्रा आणि इंदूर येथून बटाटा सुमारे ५० ट्रक आवक झाली होती. 

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ३०० गोणी, टॉमेटो सुमारे ५ हजार क्रेट, फ्लॉवर १२; तर कोबी सुमारे ८ टेम्पो, ढोबळी मिरची सुमारे ७ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, भुईमूग शेंग सुमारे १२५ गोणी, तसेच कांदा सुमारे ८० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 
कांदा- १००-१४०, बटाटा- १००-१५०, लसूण- ४००-९००, आले : सातारी ६००-९००, भेंडी : २००-३००, गवार : २००-३००, टोमॅटो- ८०-१२०, दोडका : ४००-४२०, हिरवी मिरची : ३००-४००, दुधी भोपळा : ६०-१२०, चवळी : १५०-१६०, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी ४००-४२०, पांढरी ३००-३२०, पापडी : २५०- ३००, पडवळ : २५०-२८०, फ्लॉवर : १००-१५०, कोबी : १५०-२००, वांगी : १५० -२५०, डिंगरी : १८० -२००, नवलकोल : १५० -१६०, ढोबळी मिरची : ३००-४००, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : ६००, गाजर : १८०-२२० वालवर : ३००-३५०, बीट : १५०-१६०, घेवडा : ३५०-५००, कोहळा : १५० -२००, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे : १८० -२००, ढेमसे : १५०-२००, भुईमूग : ४५० -५५०, पावटा : ५००-६००, मटार : १०००-१२००, तांबडा भोपळा ८०-१२०, चिंच अखंड ३५०, फोडलेली ५००, सूरण : २५०-२६०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे ६० हजार; तर मेथीची सुमारे अवघी सुमारे १५ हजार जुड्या आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : २५०० -५०००, मेथी : १५००-२५००, शेपू : १०००-१५००, कांदापात : १०००-१५००, चाकवत : १००० -१५००, करडई : ५०० -८००, पुदिना : ३००-८००, अंबाडी : १०००-१५००, मुळे : १५००-२०००, राजगिरा : १००० -१२००, चुका : ८००-१०००, चवळई : ८०० -१२००, पालक : ५०० -८००. 

फळबाजार
रविवारी (ता. ७) मोसंबी सुमारे २० टन, संत्री २ टन, डाळिंब २०० टन, पपई १५ टेम्पो, लिंबे सुमारे ३ हजार गोणी, चिकू दोनशे डाग, कलिंगड १० टेम्पो, खरबूज २ टेम्पो, पेरूची सुमारे १५० क्रेट आवक झाली होती. फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ७०-५००, मोसंबी : (३ डझन) : १८०-३५०, (४ डझन ) : ६०-१८०, संत्रा : (३ डझन) : २५०-४५०, (डझन ४) : १२०-२२०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २५-११० गणेश १०-४०, आरक्ता १५-५०. कलिंगड : ७-१२, खरबूज : १०-२२, पपई : ८-१४, चिकू : १००-५००, पेरू (२० किलो) ४००-५००,

फुलबाजार
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ३०-६०, गुलछडी : ३०-५०, बिजली- ६०-१००, कापरी : ५०-८०, मोगरा : ८०-१२०, शेवंती- ६०-१००, आॅस्टर : ३०-४०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-३०, गुलछडी काडी : १०-३०, डच गुलाब (२० नग) : ५-८०, लिली बंडल : २-४ जर्बेरा : २०-४०, कार्नेशियन : ८०-१५०.

मटण मासळी 
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. ७) खोल मुद्रातील मासळीची सुमारे ७ टन, खाडीची १०० किलो; तर नदीच्या मासळीची दीड टन आवक झाली होती; तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १२ टन आवक असल्याची माहिती ठाकूर परदेशी यांनी दिली. गावरान आणि इंग्लिश अंड्याच्या शेकड्याच्या दरात शेकडा १० ते १५ रुपये वाढ झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत मटण स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. 

खोल समुद्रातील मासळी 
(प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १४००-, ५००, मोठे १४००-१५००, मध्यम: ९००, लहान ७००-७५०, भिला : ५००-६००, हलवा : ७००, सुरमई : ७००, रावस : लहान ७५०, मोठा : ९००, घोळ : ८००,  भिंग : ०००, करली ००० करंदी-००, पाला : लहान ७००, मोठा १०००, वाम : पिवळी लहान ६०० मोठी ८००  काळी : ४००, ओले बोंबील : २८०-३२०, कोळंबी ः लहान २८०-३२८, मोठी : ४८० जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १४००, मोरी : लहान : २४०, मोठी- ४४०, मांदेली : १४०-१६०, राणीमासा : २४०, खेकडे : २८०, चिंबोऱ्या : ५५०

खाडीची मासळी 
सौंदाळे : ०००, खापी ०००, नगली : लहान : ४८० मोठी ६००-७००, तांबोशी : ४८०, पालू : ३६०, लेपा : लहान २४० मोठे ३५०, शेवटे : ४ ००. बांगडा : २४०, पेडवी : ०००, बेळुंजी : १६०, तिसऱ्या : २००, खुबे १४०, तारली : १६०

नदीची मासळी  
रहू : १६०, कतला : १६०, मरळ : लहान २८० मोठे- ४८०, शिवडा : २४०, चिलापी : ६०,  खवली : २००, आम्ळी: १०० खेकडे : २००, वाम : ४८०-५५०
 
मटण 
बोकडाचे : ५००, बोल्हाईचे : ५००, खिमा: ५००, कलेजी : ५८०.
चिकन 
चिकन : १६०, लेगपीस : १९०, जिवंत कोंबडी : १३०, बोनलेस : २६०. 
अंडी 
गावरान : शेकडा : ६६०, डझन : ९० प्रतिनग : ७.५० इंग्लिश : शेकडा : ४८० डझन : ६६ प्रतिनग : ५.५
 


इतर ताज्या घडामोडी
ठिबक सिंचनातील पंप निवडीसाठी तांत्रिक...महाराष्ट्रामध्ये शेतकरी कापूस, हळद, ऊस, संत्रा,...
वारणा, गोकुळ दूध संघांकडून दरात वाढकोल्हापूर : जिल्हा दूध संघ (गोकुळ) आणि वारणानगर...
नाशिक : अतिवृष्टीनंतर कपाशीवर करपाचा...नाशिक : अतिवृष्टीमुळे सातत्याने कपाशी लागवडीमध्ये...
कृषी संशोधन केंद्रे पांढरा हत्ती ठरू...भंडारा ः सर्वाधिक रोजगार शेतीमधून उपलब्ध होऊ शकतो...
मधमाश्या, मित्रकीटक वाचविण्यासाठी...नाशिक: मधमाश्यांची संख्या जगभरात तसेच भारतातही...
बाधितांसाठी मागितले दहा कोटी अन्‌...आटपाडी, जि. सांगली ः अवकाळी पावसामुळे आटपाडी...
शेतकरी संघटनेचे गुरुवारी निर्बंधमुक्ती...नगर ः संपूर्ण कर्जमाफी करून राज्यातील शेतकऱ्यांचा...
पुणे : फळपीक विमा योजना असून नसल्यासारखीपुणे : फळपिकांना हवामानाच्या धोक्यापासून संरक्षण...
गडहिंग्लजमध्ये ज्वारीचे क्षेत्र एक हजार...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : अतिवृष्टी आणि अवकाळी...
बाजारपेठेवर आधारित पीकपद्धतीचा अवलंब...नगर  : ‘‘कमी पाणी व जास्त पाणी, अशा दोन...
नवीन वर्षात ७५० ग्रामपंचायतींच्या...पुणे : येत्या नवीन वर्षात जुलै ते डिसेंबर २०२० या...
हिंगोली जिल्ह्यात रब्बीची ७६ हजार...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात सोमवार...
पुण्यात पालेभाज्यांसह कांद्याच्या आवकेत...पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
गहू, हरभरा पिकांसाठी एकात्मिक...या वर्षी परतीच्या पावसाचे प्रमाण अधिक राहिल्याने...
शेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...
कृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...
कडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान...अकोला  ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत...
अमरावती ‘एसआयटी’कडूनही अजित पवार निर्दोषमुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ...
नांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १...नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी...
पुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर...पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत...