गुलटेकडीत कांदा, लसूण, कोबीच्या दरात सुधारणा

गुलटेकडीत कांदा, लसूण, कोबीच्या दरात सुधारणा
गुलटेकडीत कांदा, लसूण, कोबीच्या दरात सुधारणा

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे दीड लाख, तर मेथीची ६० हजार जुड्या आवक झाली होती. कोथिंबिरीच्या आवकेत सुमारे ५० टक्के जुड्या खराब असल्याने दर वाढले होते. दरम्यान गणेशोत्सव आणि हरितालिकेमुळे फुलांची आवक, मागणीबरोबर दरात वाढ झाली होती. तर भाजीपाल्यांमध्ये कांदा, लसूण आणि कोबीची दरवाढ झाली होती. इतर भाव स्थिर होते.  

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथून सुमारे १५ टेंपो हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथून ५ ट्रक कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ५ टेंपो, इंदूर येथून गाजर सुमारे ६ टेंपो, कर्नाटकातून घेवडा सुमारे ४ टेंपो, गुजरात येथून भुईमूग शेंगा सुमारे १ टेंपो, तर मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ६ हजार गोणी, तर आग्रा आणि इंदूर येथून बटाटा सुमारे ६० ट्रक आवक झाली होती. 

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार २०० गोणी, टॉमेटो सुमारे ६ हजार क्रेट, फ्लॉवर सुमारे १० तर कोबी सुमारे ६ टेंपो, भेंडी १० टेंपो, गवार ८ टेंपो, सिमला मिरची आणि तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे १० ते १२ टेंपो, मटार ७ टेंपो, भुईमूग शेंग सुमारे १०० गोणी, शेवगा ३ टेंपो, हिरवी मिरची ५ टेंपो, तसेच कांदा सुमारे ७० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :  कांदा - २२०-२६०, बटाटा- ८०-१४०, लसूण - ६००-१२००, आले : सातारी ४००-६५०, भेंडी : २५०-३००, गवार : सुरती - २५०-५००, टोमॅटो - १००-१४०, दोडका : १००-२००, हिरवी मिरची : २५०-३००, दुधी भोपळा : १००-१२०, चवळी : २००-२५०, काकडी : ८०-१००, कारली : हिरवी १५०-२००, पांढरी १००-११०, पापडी : १००- १५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर :  १००-१२०, कोबी : २०० - २२०, वांगी : ३०० -४००, डिंगरी : १५० -२००, नवलकोल : १४० -१५०, ढोबळी मिरची : १५०-२००, तोंडली :  कळी १५०-२००, जाड : ९०-१००, शेवगा : ४००, गाजर :  ३५०-४०० वालवर : २५०-३००, बीट : १५०-२००, घेवडा : ३००-४००, कोहळा : १०० -१५०, आर्वी : २५०- ३००, घोसावळे : १५० -२००, ढेमसे : २००-२५०, भुईमूग : ४५० -५५०, पावटा : २५०-३००, मटार : स्थानिक- ६००- ७००, तांबडा भोपळा १००-१५०, सुरण : २६०-२८०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्या  पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ४०० -१०००, मेथी : १०००-१६००, शेपू : ५००-८००, कांदापात : ८०० -१०००, चाकवत : ८०० -१०००, करडई : ७०० -८००, पुदिना : ३०० -६००, अंबाडी : ५००-६००, मुळा : १०००-१८००, राजगिरा : ८०० -१०००, चुका : ७००-१०००, चवळई : ८०० -१०००, पालक : ६०० -८००.

फुलबाजार

सोमवार (ता. २) पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त फूल बाजारात विविध फुलांची आवक वाढली आहे. तर मागणीदेखील वाढल्याने विविध फुलांचे दरदेखील वाढले होते. यामध्ये प्रामुख्याने झेंडू, गुलछडी, शेवंती आणि डच गुलाबासह अ‍ॅस्टरसह सजावटीसाठी आवश्‍यक असलेल्या शोभिवंत कट फ्लॉवरचा समावेश होता. फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ४०-१००, गुलछडी : २५०-४००, बिजली : १५०-२५०, कापरी : ५०-१००, शेवंती : १००-२००, अ‍ॅस्टर : ३०-५०, गलांड्या : १५-२५ (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ३०-७०, गुलछडी काडी : २०-६०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, लिलि बंडल : ४०-५०,  जरबेरा : ८०-१००, कार्नेशियन : १४०-२५०.

फळबाजार  रविवारी (ता. १) मोसंबी सुमारे ७० टन, संत्री २० टन, डाळिंब ४०० टन, पपई २० टेम्पो, लिंबे सुमारे दीड हजार गोणी, चिकू ४ हजार डाग, कलिंगड १५ टेंपो, खरबूज २ टेंपो, पेरूची सुमारे ६०० क्रेट आवक झाली होती.  फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३००-१०००, मोसंबी : (३ डझन) : १७०-३५०, (४ डझन ) : ८०-१५०, संत्रा : (३ डझन) : १८०-३५०, (डझन ४) : १२०-१८०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ३०-१३० गणेश १०-४०, आरक्ता २०-५०. कलिंगड : ५-२० खरबूज : १०-३५, पपई : ५-३०, चिकू : १००-५००, पेरु (२० किलो) ८००-१०००, सफरचंद सिमला (२५ किलो) - १५००-२५००.

मटण-मासळी  गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. १) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ८ टन, खाडीची ४०० किलो तर नदीच्या मासळीची दीड टन आवक झाली. तसेच आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची ८ टन आवक झाली होती. हरितालिका आणि गणेशोत्सवामुळे मासळीची मागणी कमी असल्याने दरामध्ये घट झाली होती. तर चिकनचे भाव प्रतिकिलोमागे दहा रुपयांनी घटले होते. तर मागणी वाढल्याने गावरान व इंग्लिश अंड्याच्या भावात अनुक्रमे १० व २५ रुपयांनी वाढ झाली होती. तर मटणाचे भाव स्थिर होते.   खोल समुद्रातील मासळी 

(प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १४००, मोठे १४००, मध्यम : ८००, लहान ६००, भिला : ४००-५००, हलवा : ४५०-५५०, सुरमई : ४८०-५५०, रावस : ४८०-५५०, घोळ : ४८०, भिंग : ३२०, करली : २००-२८०, करंदी : २८०, पाला : ७००-१२००, वाम : पिवळी ४००-४८०,  काळी : २८०, ओले बोंबील : ६०-१६०, कोळंबी ः २४०-४००, जंबो प्रॉन्स : १४००, किंग प्रॉन्स : ७००, लॉबस्टर : १३००, मोरी : २००, मांदेली : १२०, राणीमासा : १६०-२००, खेकडे : १६०-२००, चिंबोऱ्या : ४८०. 

खाडीची मासळी  सौंदाळे : २४०, खापी : २४०, नगली : ३२०-६००, तांबोशी : ४८०, पालू : २४०, लेपा : १००-२००, शेवटे : २४०, बांगडा : १६०-२४०, पेडवी : ६०, बेळुंजी : १२०, तिसऱ्या : १६०, खुबे : १२०, तारली : १४०. 

नदीची मासळी  रहू : १४०, कतला : १४०, मरळ : २४०, शिवडा : २००, चिलापी : ८०, खवली : २००, आम्ळी : १००, खेकडे : २४०, वाम : ४८०. 

मटण  बोकडाचे : ५००, बोल्हाईचे : ५००, खिमा : ५००, कलेजी : ५८०. चिकन  चिकन : १३०, लेगपीस : १६०, जिवंत कोंबडी : १००, बोनलेस : २४०.  अंडी   गावरान : शेकडा : ६०० डझन : ८४ प्रति नग : ७. इंग्लिश : शेकडा : ३६५ डझन : ४८ प्रतिनग : ४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com