Agriculture news in Marathi Improvement in soybean futures | Agrowon

सोयाबीन वायद्यांत सुधारणा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 डिसेंबर 2021

वायदे आणि हजर बाजारात सोयाबीनचे दर दोन दिवसांत ५०० ते ८०० रुपयांनी पडल्यानंतर बुधवारी (ता. १) दरात काहीशी सुधारणा झाली होती. तर खासदार अमोल कोल्हे आणि प्रतापराव जाधव यांनी पत्रे लिहून सोयापेंड आयातीसाठी मुदतवाढ देण्यास विरोध केला आहे.

पुणे ः बाजारात सोयाबीनचे दर पडल्यानंतर केंद्रीय पशुसंवर्धनमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांच्या भूमिकेवर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. वायदे आणि हजर बाजारात सोयाबीनचे दर दोन दिवसांत ५०० ते ८०० रुपयांनी पडल्यानंतर बुधवारी (ता. १) दरात काहीशी सुधारणा झाली होती. तर खासदार अमोल कोल्हे आणि प्रतापराव जाधव यांनी पत्रे लिहून सोयापेंड आयातीसाठी मुदतवाढ देण्यास विरोध केला आहे.

केंद्रीय पशुसंवर्धनमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनची मागणी पुढे रेटत विदेश व्यापार महासंचालक अमित यादव यांना पत्र लिहून साडेपाच लाख टन सोयापेंड आयातीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्यामुळे बाजारात सोयाबीनचे दर पडले होते. सोमवारी ही बातमी सगळीकडे पसरल्यानंतर मंगळवारपर्यंत सोयाबीनच्या दरात जवळपास ५०० ते ८०० रुपयांची घसरण झाली होती. वायद्यांतही ५०० ते ७०० रुपयांची घसरण झाली होती. मात्र बुधवारी (ता. १) वायद्यांत काहीशी सुधारणा झाली होती. वृत्त लिहीपर्यंत डिसेंबरचे वायदे २१२ रुपयांनी सुधारून ६ हजार १३० रुपये ते ६ हजार ३५६  रुपयांनी झाले. जानेवारीच्या वायद्यांत २२९ रुपयांची वाढ झाली होती. तर वायदे ६ हजार ३३ रुपये ते ६ हजार ३४९ रुपयांनी झाले. 

दरम्यान, रूपाला यांच्या भूमिकेचा सर्वच स्तरांतून विरोध होत आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी रुपाला यांना पत्र लिहून आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची सूचना केली. तर बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पत्र लिहून सोयापेंड आयातीला मुदत देऊ नये, अशी मागणी केली. तर महाराष्ट्रातील आणि मध्य प्रदेशातील काही शेतकरी उत्पादक कंपन्यांनीही रूपाला यांच्यावर टीका करत हा निर्णय शेतकऱ्यांना मातीत घालणारा असल्याचे म्हटले आहे.

हजर बाजारातही सुधारणा
एनसीडीईएक्सवरील हजर बाजारातही सुधारणा झाली आहे. सोयाबीन दरात बुधवारी दोन टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली होती. या सुधारणेसह सोयाबीनचे व्यवहार इंदूर येथील केंद्रावर ६ हजार ३२१ रुपयांनी झाले. तर कोटा येथे ६ हजार ३८१ रुपयांनी सोयाबीन विकले गेले. नागपूर येथे व्यवहार ६ हजार ४१३ रुपयांनी झाले. तर अकोला येथील केंद्रावर सोयाबीनला ६ हजार ३६३ रुपये दर मिळाला. वायद्यांबरोबरच हजर बाजारातही सुधारणा झाली आहे.

पोल्ट्री उद्योगाला सोयापेंड घ्यावीच लागते. सोयापेंडचे दर वाढल्यानंतर पोल्ट्रीचे अर्थकारणही बदलते याची सर्वांना जाणीव आहे. मात्र सोयापेंड आयात हा त्यावरील मार्ग होऊ शकत नाही. सोयाबीन उत्पादकांना मातीत घालण्याचे सरकारचे धोरण कायम राहिल्यास देशातील सोयाबीन लागवड आणि उत्पादनही कमी होईल. त्यामुळे केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी आपल्या मागणीचा पुनर्विचार करावा. 
- डॉ. अमोल कोल्हे, खासदार 

यंदा देशात सोयाबीनचे चांगले उत्पादन झाले असून, शेतकऱ्यांनी विचारपूर्वक विक्री सुरू केल्याने दर सहा हजारांपर्यंत वाढले आहेत. परंतु रूपाला यांच्या मागणीमुळे दरात घसरण झाली. अशा परिस्थितीत सोयापेंड आयातीला मुदतवाढ दिल्यास आधीच दोन वर्षांपासून कोरोनामुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना खाईत लोटण्याचे काम होईल. सरकारने बाजारात हस्तक्षेप न केल्यास शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कल्याणाचा विचार करून सरकारने सोयापेंड आयातीला मुदतवाढ देऊ नये, अशी मागणी केलेले पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना दिले आहे. 
- प्रतापराव जाधव, खासदार


इतर बातम्या
आकडेवारीची जबाबदारी राज्याचीपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...
 सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...
उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...
वीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा...शेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज...
Top 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
साखर उत्पादनात यंदा महाराष्ट्र अव्वल ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या (AISTA) पीक...
उन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...
पावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...
येते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार?पुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
डीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...
ओबीसींचा न्याय्य हक्क त्यांना देणारच ः...नागपूर : ‘डेटा देणार की नाही, देणार असतील तर...
एक लाख ६९ हजार शेतकरी कर्जमुक्त बुलडाणा : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
कोल्हापूरसाठी ४०० कोटींचा निधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक...
मृत कर्जदारांची सुधारित माहितीसाठी २९...बुलडाणा : कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मृत कर्जदारांची...
धुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...
खतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....
खांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...
‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...
खाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...