हिंगोलीत सोयाबीन दरात सुधारणा

हिंगोली ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन तेजीत आहे. गेल्या आठवड्यापासून सोयाबीनच्या किमान आणि कमाल दरात सुधारणा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
Improvement of soybean price in Hingoli
Improvement of soybean price in Hingoli

हिंगोली ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन तेजीत आहे. गेल्या आठवड्यापासून सोयाबीनच्या किमान आणि कमाल दरात सुधारणा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात (भुसार मार्केटमध्ये) सोमवारी (ता. २२) ते शनिवार (ता. २७) या कालावधीतील पाच दिवस सोयाबीनची ६ हजार २२१ क्विंटल आवक झाली. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ५९०० ते कमाल ७२३० रुपये दर मिळाले. शनिवारी (ता.२७) सोयाबीनची ९०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६१०० ते कमाल ६८०० रुपये, तर सरासरी ६४५० रुपये दर मिळाले.  

शुक्रवारी (ता. २६) १०६१ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६१९० ते कमाल ७२३० रुपये, तर सरासरी ६७५० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.२५) १६६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६०५० ते कमाल ६६३५ रुपये, तर सरासरी ६३६७ रुपये दर मिळाले. बुधवारी (ता.२४) १५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ६५५० रुपये, तर सरासरी ६२७५ रुपये दर मिळाले.

सोमवारी (ता.२२) ११०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ५९०० ते कमाल ६४५० रुपये, तर सरासरी ६१७५ रुपये दर मिळाले. परभणी बाजार समितीमध्ये सोमवार (ता. २२) ते शुक्रवार (ता. २६) पर्यंत सोयाबीनची १३३४ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल किमान ५१०० ते ६५५० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com