agriculture news in marathi Improvement in soybean prices in Washim | Agrowon

सोयाबीनच्या दरात वाशीममध्ये सुधारणा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 नोव्हेंबर 2021

वाशीम : दिवाळीपूर्वी सोमवारी (ता.१) झालेल्या व्यवहारात येथे सोयाबीन ५३५१ रुपये दराने कमाल विक्री झाले. येथे आवक सध्या सहा हजार पोत्यांवर पोहोचली आहे.

वाशीम : वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात गेल्या आठवड्यात हलकी सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. दिवाळीपूर्वी सोमवारी (ता.१) झालेल्या व्यवहारात येथे सोयाबीन ५३५१ रुपये दराने कमाल विक्री झाले. येथे आवक सध्या सहा हजार पोत्यांवर पोहोचली आहे.

या हंगामात सुरुवात होण्यापूर्वीच सोयाबीनचे दर दबावात होते. सोयापेंडची आवक केल्याचाही दरांवर मोठा परिणाम झाला. सोयाबीन पाच हजारांच्या आत विक्री व्हायला लागले. खेडा खरेदीत हाच दर ४२०० पर्यंत होता. या आठवड्यात मात्र दरांमध्ये थोडा बदल दिसून येत आहे. २५ ऑक्टोबरला कमाल ४८०० असलेला दर सोमवारी ५३५१ पर्यंत पोहोचला होता. साधारणपणे कमाल दरात पाचशेची सुधारणा झालेली दिसून येते. तर किमान दरसुद्धा ४००० वरून ४४०० झाला. 

गेल्या हंगामातील सोयाबीन या बाजारात उच्चांकी दहा हजारांपर्यंत पोहोचले होते. याशिवाय इतर वेळीसुद्धा वाशीम बाजार समितीत या भागात सर्वाधिक दर मिळाला होता. यामुळे वाशीम बाजार समितीतील दरांकडे शेतकऱ्यांचे विशेष करून लक्ष लागून असते. या बाजार समितीतील आवक दिवाळीच्या तोंडावर सहा हजार क्विंटलपर्यंत पोहोचली होती. परंतु आता दिवाळीमुळे बाजार समिती सोमवार (ता. ८) पर्यंत बंद राहणार आहे. सलग आठवडाभर बाजार बंद असल्याने आता शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागेल.

वाशीममध्ये सोयाबीनची गेल्या आठवड्यातील आवक (क्विंटल) व दर (रु.)

तारीख किमान कमाल आवक
१ नोव्हेंबर ४४०० ५३५१ ६२७६ 
३० ऑक्टो ४४०० ५२०० ६४६९  
२९ ऑक्टो ४००० ५००५ ४५८५ 
२८ ऑक्टो ४००० ५०५० ४३९५     
२७ ऑक्टो ४००० ५००० ५३४९  
२६ ऑक्टो ४२०० ४८५० ५५५०
२५ ऑक्टो ४००० ४८०० ६१९५

 


इतर बाजारभाव बातम्या
लातूर बाजार समितीमध्ये कोबी, फ्लॉवर,...लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतर...
गेवराईतील बाजारात तीळ, मटकीला वाढीव दरगेवराई, जि. बीड : गेवराई कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरचीला ५५०० रुपये दरऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कळमणात तूर हमीदराखालीनागपूर ः तुरीच्या दरात गेल्या आठवड्यात चांगली...
नगरमध्ये भाजीपाला दरात सुधारणा कायमनागपूर  नगर ः नगर येथील दादा पाटील...
काकडीच्या दरात सुधारणा, फळभाज्यांचे दर...पुणे : मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव - कारंजा बाजार समितीत आज...
Top 5 News: खाद्यतेल बाजाराची...1. सध्या मध्य प्रदेशच्या मध्यभागी हवेचे कमी...
राज्यात हिरवी मिरची १२०० ते ६५०० रुपयेपरभणीत ४००० ते ६५०० रुपये परभणी ः येथील पाथरी...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात...
Top 5 News: हरभरा पेरणीत आता महाराष्ट्र...1. उत्तर महाराष्ट्रात सध्या सकाळी धुक्याची दाट...
जालन्यात हिरवी मिरची, गवार,...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
लाल कांद्याच्या दरात नाशिकमध्ये सुधारणानाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात कांद्याची विक्रमी आवक; दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरला वांगी, शेवगा, गवारीचे दर टिकून​ नगर  : नगर येथील दादा पाटील...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज मानवत बाजारात...
रब्बीचा पेरा : कडधान्य स्थिर; तर...पुणे - यंदा देशात रब्बी पिकांच्या पेरणीत (Rabbi...
पुण्यात सिमला, हिरवी मिरचीच्या दरात...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
लातूरमध्ये वांगी सरासरी १६०० रुपये...लातूर : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१५)...
राज्यात काकडी ५०० ते ३००० रुपयेसांगलीत क्विंटलला १००० ते १५०० रुपये सांगली ः...