agriculture news in Marathi, Improvement of tomatoes, cucumber, green chillies | Agrowon

टोमॅटो, काकडी, हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 फेब्रुवारी 2019

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ३) सुमारे १४० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाल्यांची आवक कमीच असून भेंडी, गवार, टोमॅटो, काकडी, सिमला आणि हिरव्या मिरचीच्या दरात वाढ झाली होती. तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे अडीच लाख, तर मेथीची सुमारे दीड लाख जुड्या आवक झाली होती.

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ३) सुमारे १४० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाल्यांची आवक कमीच असून भेंडी, गवार, टोमॅटो, काकडी, सिमला आणि हिरव्या मिरचीच्या दरात वाढ झाली होती. तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे अडीच लाख, तर मेथीची सुमारे दीड लाख जुड्या आवक झाली होती.

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून सुमारे १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातून सुमारे १५ ट्रक मटार, राजस्थानातून १३ ट्रक गाजर आणि मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी आवक झाली होती.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार गोणी, टोमॅटोे सुमारे ५ हजार क्रेट, कोबी १० तर फ्लॉवर सुमारे १५ टेम्पो, भेंडी ८ टेम्पो, गवार ३ टेम्पो, ढोबळी मिरची १० टेम्पो, हिरवी मिरची २ टेम्पो, पावटा ५ टेम्पो आवक झाली होती. तर कांदा नवीन सुमारे १०० तर जुना २ ट्रक आवक झाली होती. तसेच स्थानिकसह आग्रा, इंदूर येथून बटाट्याची ४० ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :
कांदा : जुना ३०-५०, नवीन ५०-७०, बटाटा : १००-१३०, लसूण : १००-२५०, आले : सातारी ५५०-६००, भेंडी : ३५०-४५०, गवार : गावरान, सुरती ५००-७००, टोमॅटो : १२०-१६०, दोडका : ३५०-४००, हिरवी मिरची : ३००-४००, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : २००-३००, काकडी : २५०-३५०, कारली : हिरवी- ४०० पांढरी ३००, पापडी : १५०-१६०, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : ८०-१००, कोबी : १००-१२०, वांगी : १००-२००, डिंगरी : २००- २५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : ३००-३५०, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : १५०-१८०, शेवगा : ४००-४५०, गाजर : १००-१३०, वालवर : १६०-१८०, बीट : १२०-१५०, घेवडा : ३५०-४००, कोहळा : १५०-२००, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे : २००-२२०, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग : ५००-५५०, पावटा : २५०-३००, मटार : १६०- २००, तांबडा भोपळा : १००-१५०, सूरण : १८०-२००, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे अडीच लाख, तर मेथीची सुमारे दीड लाख जुड्या आवक झाली होती.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ३००-४००, मेथी : २००-३००, शेपू : ४००-७००, कांदापात : ४००-६००, चाकवत : ४००-५००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ४००-५००, मुळे : ८००-१०००, राजगिरा : ४००-५००, चुका : ५००-८००, चवळई : ४००-६००, पालक : ३००-४००, हरभरा गड्डी : ५००-६००.

फुल बाजार
फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ३०-४०, गुलछडी : ८०-१२०, बिजली : २०-४०, कापरी : २०-४०, सुटा कागडा : ८०-१००, मोगरा : ६००, ॲस्टर : १६-२०, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : १५-२०, गुलछडी काडी : १०-२०, डच गुलाब (२० नग) : ६०-११०, लिली बंडल : ५-१०, जरबेरा - २०-३०, कार्नेशियन : ६०-८०, शेवंती : ८०-१००.

मासळी बाजार
गणेश पेठ येथील मासळी बाजारात खोलसमुद्रातील मासळीची सुमारे १० टन, खाडीची सुमारे ६०० किलो, नदीची सुमारे १ टन आवक झाली. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १४ टन आवक झाली होती. अशी माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले.  
दरम्यान इंग्लिश अंड्याच्या दरात शेकड्याला १० ते १५ रुपयांनी घट झाली आहे. मटण आणि चिकनचे दर  मागच्या आठवड्याच्या तुलनते स्थिर असल्याची माहिती व्यापारी रूपेश परदेशी आणि प्रभाकर कांबळे यांनी दिली. 

खोल समुद्रातील मासळी 
(प्रतिकिलोचे भाव) :

पापलेट : कापरी : १६००-१८००, मोठे  १६००, मध्यम : १२००, लहान ८००-९०० भिला : ६००-७००, हलवा : ६५०, सुरमई : ७००-७५०, रावस-लहान : ६५०-७००, मोठे ८००-९००, घोळ : ७००, करली :३२०-३६०, करंदी  (सोललेली) : ३६०,  भिंग ४००, पाला : लहान ७००, मोठे :१२००, वाम : लहान ४८०-५२०, पिवळी मोठे  ६५०-७५०,  काळी : ४००, ओले बोंबील : लहान १००-१२०, मोठे १६०-२००, 
कोळंबी ः लहान :३२०, मोठी : ४८०, जंबो प्रॉन्स :१५००, किंग प्रॉन्स : ९५०, लॉबस्टर : १४००, मोरी : लहान  २००, मोठे ३२०, मांदेली : १००-१२०, राणीमासा : २००-२४०, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ५५०-६००, 

खाडीची मासळी : सौंदाळे : २८०, खापी २४०, नगली : लहान २८०-३२० मोठी ५५०, तांबोशी ४८०, पालू : २८०, लेपा : लहान १६०, मोठे २४०, शेवटे : २८० बांगडा : लहान १४०-१६०, मोठा २००-२४०, पेडवी : ४०, बेळुंजी : १४०-१६०, तिसऱ्या : २००, खुबे १६०, तारली : १६०-२०० 

नदीची मासळी : रहू : १६०-१८०, कतला :१८०- २००, मरळ : लहान २८०, मोठी ४४०-४८०, शिवडा : २४० चिलापी : ६०, मागुर : १४०, खवली : २००, आम्ळी : १२० खेकडे : २४०, वाम : ५५०. 

मटण : बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०. 
चिकन : चिकन : १५०, लेगपीस : १८०,जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०. 
अंडी : गावरान : शेकडा : ७५०, डझन : १०० प्रति नग : ८.५ इंग्लिश : शेकडा : ४३५  डझन : ६० प्रतिनग: ५


इतर ताज्या घडामोडी
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...
पुणे विभागात खरीप पेरणीत अडीच लाख...पुणे ः यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाने चांगली...
बिबट्याच्या पिंजऱ्यांशेजारीच बसून करणार...मंचर : वनखात्यानेही बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी...
खरीप पीक कर्जासाठी भाजपचा आज ठिय्याअमरावती : खरीप हंगाम अर्ध्यावर आला असतानासुद्धा...
औरंगाबादेत ग्राहकांचा रानभाज्या खरेदीला...औरंगाबाद ः आरोग्यदायी व अनेक औषधी गुणधर्म...
नगर जिल्ह्यात तुरीचा ५४ हजार हेक्टरवर...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला...
रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ पैकी ४८ धरणे...रत्नागिरी ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी...
सांगलीत अडीच हजार क्विंटल मक्याची खरेदीसांगली ः जिल्ह्यातील तीन हमीभाव केंद्रांच्या...
निकृष्ट बियाणे पुरवठादार कंपन्यांवर...अमरावती: निकृष्ट दर्जाच्या बियाणे पुरवठा प्रकरणात...
मराठवाडा विभागातील हवामानानुसार पीक...मराठवाडा विभागातील एकूण हवामान, पर्जन्यमान या...
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...