agriculture news in marathi Improvement of vegetable prices in the Nagar | Agrowon

नगरमध्ये भाजीपाल्याच्या दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याच्या दरात सुधारणा कायम राहिली.

नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याच्या दरात सुधारणा कायम राहिली. आवकही बऱ्यापैकी होत आहे. भुसारमध्ये मूग, उडीद, सोयाबीन, हरभऱ्यांची आवक होत आहे. ज्वारीची आवक जेमतेम आहे, असे बाजार समितीतून सांगण्यात आले. 

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोची दर दिवसाला ४० ते ५० क्विंटलची आवक होत आहे. १ हजार ते २ हजार व सरासरी १ हजार पन्नास रुपयाचा दर मिळत आहे. वांग्यांची २४ ते ३० क्विंटलची आवक होत आहे. २ हजार ते ४ हजार व सरासरी तीन हजाराचा दर मिळाला.

फ्लॉवरची २८ ते ३५ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ५ हजार ५०० व सरासरी ४ हजार २५० रुपये, कोबीची ३३ ते ४० क्विटंलची आवक होऊन १ हजार ते २ हजार ५०० व सरासरी १ हजार ७५० रुपये, काकडीची ३० ते ३५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार व सरासरी १ हजार ५००, गवारीची ७ ते १२ क्विंटलची आवक होऊन ५ ते ७ हजार व सरासरी ६ हजार रुपये दर मिळाला.

भेंडीची २५ त ३० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार ५०० व सरासरी १ हजार ७५० रुपये दर मिळाला. घेवड्याची २ ते ५ क्विंटलची आवक झाली. दर ५ ते ७ हजार व सरासरी ६ हजार रुपये मिळाला. बटाट्याची ३३० ते ३५० क्विंटलची आवक होऊन २ हजार ८०० ते ३ हजार २०० व सरासरी ३ हजार, हिरव्या मिरचीची ३४ ते ४० क्विंटलची आवक होऊन ३ ते ५ हजार व सरासरी ४ हजार, शेवग्याची ५ ते ७ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ६ हजार व सरासरी ५ हजार रुपये दर मिळाला.

आल्याची १७ ते २५ क्विंटलची आवक झाली. सरासरी ४ हजार २५० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला, असे बाजार समितीचे सचीव अभय भिसे यांनी सांगितले.

भुसारमध्ये आवक जेमतेम

भुसारमध्ये हरभरा, मूग, उडीद, सोयाबीनची आवक होत आहे. अधूनमधून ज्वारीचीही आवक जेमतेम होत आहे. ज्वारीला २ हजार ५०० ते ३ हजार रुपयाचा प्रतिक्विंटल दर मिळत आहे. हरभऱ्याची दररोज ५० क्विंटलची आवक होत आहे. ३४०० ते ५०५० रुपये, मुगाची ७५ ते १०० क्विंटलची आवक होत असून ३५०० ते ७७०० रुपये, उडदाची ३० ते ५० क्विंटलची आवक होत आहे. ३६०० ते ६५०० रुपये दर मिळाला. सोयाबीनची १०० ते १५० क्विंटलची आवक होऊन ३५०० ते ३८५१ रुपयाचा दर मिळत आहे.


इतर बाजारभाव बातम्या
जळगावात भरताची वांगी १८०० ते २६०० रुपये जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
संत्राचे व्यवहार ११०० ते १४०० रुपये...नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरातील तेजीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, घेवड्याला...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबाद : हिरवी मिरची सरासरी ३०००...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत ढोबळी मिरचीची पंधरा क्विंटल आवकपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये...पुण्यात २००० ते ३००० रुपये पुणे : पुणे बाजार...
पपई दर निम्म्यावर; शेतकऱ्यांना फटका जळगाव : खानदेशात गेल्या २० ते २५ दिवसात...
मक्‍याच्या बाजारभावात दौंडमध्ये २००...दौंड, जि. पुणे : दौंड तालुक्‍यात मक्‍याची आवक...
नाशिकमध्ये ढोबळी मिरचीची आवक सर्वसाधारण...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मिरचीला दराचा तडकाअकोला ः हिरवी मिरची यंदा संपूर्ण हंगामात चांगल्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवाळी दिवशीही... कोल्हापूर  : जिल्ह्यात यंदा झेंडू...
जळगावात झेंडूच्या बाजारात तेजीजळगाव : झेंडू फुलांची दिवाळीनिमित्त मोठी मागणी...
नाशिकमधील झेंडू उत्पादकांचा थेट...नाशिक : चालू वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेला परतीचा...
नगरमध्ये शेवंतीची फुले चारशे रुपये किलो नगर ः नवरात्रोत्सवात झालेल्या जोरदार पावसामुळे...
औरंगाबादमध्ये झेंडू सरासरी ६५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत पेरू १००० ते कमाल २५०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला...
राज्यात गवार १५०० ते ७००० रुपये...पुण्यात ५००० ते ७००० रुपये दर पुणे ः...
नाशिकमध्ये डाळिंब ७ हजार ५०० रुपये...नाशिक : ‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...