सोलापुरात वांगी, घेवडा, गवारीच्या दरात सुधारणा

सोलापुरात वांगी, घेवडा, गवारीच्या दरात सुधारणा
सोलापुरात वांगी, घेवडा, गवारीच्या दरात सुधारणा

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता.३) वांगी, घेवडा, गवारीच्या दरात पुन्हा वाढ झाली. त्यांची आवकही तुलनेने कमीच राहिली. पण मागणी असल्याने दरात सुधारणा राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात मंगळवारी वांग्याची ५० ते १०० क्विंटल आवक झाली. घेवड्याची ५ क्विंटल आणि गवारीची १५ क्विंटल आवक झाली. ही सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या दरात सुधारणा आहे. विशेषतः वांगी आणि घेवड्याला चांगला उठाव मिळतो आहे. मंगळवारी पुन्हा आवक आणि मागणीतील तफावतीमुळे दरात सुधारणा राहिली. 

वांग्याला प्रतिक्विंटलला किमान १७०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये भाव मिळाला. घेवड्याला २५०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपयांचा दर मिळाला. याशिवाय गवारचे दर किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असे राहिले. किरकोळ चढ-उतार वगळता त्यांच्या दरातील सुधारणा कायम राहिली.

त्याशिवाय टोमॅटो आणि हिरवी मिरचीलाही काहीसा उठाव मिळाला. त्यांची आवक ही तशी जेमतेम राहिली. टोमॅटोची आवक एक टनापर्यंत झाली. हिरव्या मिरचीची १०० क्विंटलपर्यंत आवक झाली. टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ४०० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीला किमान ४०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय कांद्यालाही चांगला उठाव मिळाला. पण आवक जेमतेमच राहिली.

कांद्याची आवक १० ते १५ गाड्यापर्यंत राहिली. कांद्याला क्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com