कोल्हापुरात ओला वाटाणा भाज्यांच्या दरात सुधारणा

कोल्हापुरात ओला वाटाणा भाज्यांच्या दरात सुधारणा
कोल्हापुरात ओला वाटाणा भाज्यांच्या दरात सुधारणा

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात ओला वाटाणा, वरणा आदी भाज्यांच्या दरात तेजी होती. ओला वाटाण्यास दहा किलोस ९०० ते १००० रुपये दर मिळाला. वरण्यास दहा किलोस २५० ते ४०० रुपये दर होता. ओला वाटाण्याची दररोज दहा ते वीस पोती आवक होती. वरण्याची दररोज शंभर ते दीडशे पोती आवक झाली. ओल्या मिरचीची दररोज चारशे ते पाचशे पोती आवक झाली. ओल्या मिरचीस दहा किलोस ८० ते १५० रुपये दर होता.

टोमॅटोची दररोज दीड ते दोन हजार करंड्या आवक झाली. टोमॅटोस दहा किलोस २० ते ७० रुपये दर होता. टोमॅटोच्या आवकेतील वाढ गेल्या महिन्यापासून सुरूच आहे. या सप्ताहातही ही वाढ सुरू राहिल्याने टोमॅटोचे दर फारसे वाढले नसल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. वांग्याची तीनशे ते चारशे करंड्या आवक झाली. वांग्यास दहा किलोस १०० ते ६०० रुपये दर होता.

ढोबळी मिरचीची दररोज चारशे ते पाचशे पोती आवक होती. ढोबळी मिरचीस दहा किलोस ५० ते २०० रुपये दर होता. भेंडीची दीडशे ते दोनशे पोती आवक झाली. भेंडीस दहा किलोस १०० ते ३५० रुपये दर मिळाला. शेवगा शेंगेची आवकेत घट झाली. शेवगा शेंगेची दररोज केवळ दहा ते वीस पोती आवक होती. शेवगा शेंगेस दहा किलोस २५० ते ४०० रुपये दर होता.

पोलेभाज्यांमध्ये कोथिंबीरीच्या आवकेत गेल्या सप्ताहापेक्षा वाढ होती. या सप्ताहात दररोज पंचवीस ते तीस हजार पेंढ्या कोथिंबिरीची आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा ८०० ते १२०० रुपये दर होता. मेथीची तेरा ते चौदा हजार पेंढ्या आवक होती. मेथीस शेकडा ४०० ते ८०० रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com