agriculture news in marathi, Improvement in wheat rate in Khandesh | Agrowon

खानदेशात गव्हाच्या दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 एप्रिल 2019

जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लोकवन गव्हाची आवक रखडत सुरू आहे. दरात किंचीत सुधारणा झाली आहे. दर प्रतिक्विंटल १८०० ते २१५० रुपयांपर्यंत आहेत. कमाल दरात क्विंटलमागे ५० ते ५५ रुपयांची सुधारणा झाल्याची माहिती मिळाली. 

जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लोकवन गव्हाची आवक रखडत सुरू आहे. दरात किंचीत सुधारणा झाली आहे. दर प्रतिक्विंटल १८०० ते २१५० रुपयांपर्यंत आहेत. कमाल दरात क्विंटलमागे ५० ते ५५ रुपयांची सुधारणा झाल्याची माहिती मिळाली. 

जळगाव, चोपडा, अमळनेर, धुळे, दोंडाईचा (जि. धुळे), शहादा (जि. नंदुरबार) व नंदुरबार बाजार समिती गव्हासाठी प्रसिद्ध आहे. लोकवन गव्हाची आवक अधिक होते. या हंगामात पेरणीच कमी होती. परिणामी, उत्पादनावरही सर्वत्र परिणाम झाला. अपेक्षित क्षेत्राच्या तुलनेत निम्मीच पेरणी झाली होती. जळगावात सुमारे आठ हजार व धुळे, नंदुरबारात मिळून सुमारे सहा हजार हेक्‍टरवर गहू होता. त्याची मळणी जवळपास आटोपली आहे. उशिरा पेरणीच्या गव्हाची मळणी या आठवड्यात पूर्ण होईल.

अनेक शेतकरी घरात साठा करीत आहेत. काही शेतकरी गहू विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. बाजारात चंदोसी, वनफोरसेव्हन प्रकारच्या गव्हाची आवक नाही. जळगाव बाजार समितीत मागील तीन दिवस प्रतिदिन १२० क्विंटल लोकवन गव्हाची आवक झाली. चोपडा येथे प्रतिदिन १५० क्विंटल, अमळनेरात २२५ क्विंटल, शहादा येथे १५० क्विंटल, धुळे, दोंडाईचा येथे मिळून २५० क्विंटल आवक प्रतिदिन झाली. 

गहू विक्रीसाठी  शेतकरी एकत्र

गव्हाचे दर टिकून अाहेत. मध्यंतरी २१०० रुपयांपर्यंतचे दर होते. त्यात ५० ते ५५ रुपयांनी क्विंटलमागे वाढ झाली. आवक पुढे वाढू शकते. परंतु आवकेत फारशी वाढ होणार नाही. यातच शहादा, शिरपूर व चोपडा भागांतील मोठ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बडवानी, इंदूर (मध्य प्रदेश) येथील बाजारात गव्हाची पाठवणूक केली. तेथे दर २२०० रुपयांवर आहेत, असे सांगण्यात आले.


इतर बातम्या
काटेवाडीत होणार पहिला व्यावसायिक मुरघास...पुणे  ः दुष्काळी स्थितीत जनांवरासाठी चारा...
अजितदादा पालकमंत्री होण्याच्या...पुणे ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार...
ऊस वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करा ः...पुणे ः चालू वर्षी पुणे जिल्ह्यातील साखर...
नांदेड : रब्बीच्या पेरणीने सर्वसाधारण...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात बुधवार (ता. ११) पर्यंत...
सांगली जिल्ह्यात प्रतिकूल हवामानाचा तूर...सांगली  : जिल्ह्यात पोषक हवामानाअभावी तूर...
तीन जिल्ह्यांत मुगाचे दोन कोटी ४० लाख ...नांदेड  ः किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत...
बारदान्याअभावी वाढल्या धान...भंडारा ः धान उत्पादकांसमोरील अडचणी संपता संपत...
कोल्हापूर जिल्ह्यात एकरकमी एफआरपी...कोल्हापूर : नव्या सरकारकडून कर्जमाफीची शक्यता...
नक्षलग्रस्त जिल्हे पाणीपट्टी सवलतीतून...गोंदिया  ः नक्षलग्रस्त भाग, तसेच पंतप्रधान...
कोल्हापुरात पुष्पप्रदर्शनाला मोठा...कोल्हापूर : स्वागत कमानीपासूनच विविध प्रकारच्या...
हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभनागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला...
फडणवीस सरकारच्या शिवस्मारकाच्या निविदा...नागपूर : मुंबईतील बहुचर्चित शिवस्मारकाच्या...
अवकाळीग्रस्तांना हेक्टरी २५ हजारांची...नागपूर : ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...
कापूस वेचणी यंत्राचा पर्याय कधी मिळणार...अमरावती ः राज्यात कापसाचे सरासरी सुमारे ४० लाख...
...आता बटाट्याचीही टंचाईकोल्हापूर: कांद्यापाठोपाठ आता बाजारपेठांमध्ये...
कर्जमाफीची `कट ऑफ डेट` ३१ ऑगस्ट ठेवासोलापूर : युती सरकारने दीड लाखाची कर्जमाफी देऊनही...
गारठ्यात हळूहळू वाढपुणे  ः कोरड्या हवामानामुळे किमान तापमानात...
हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी घोषणेची...पुणे : महाविकास आघाडीच्या किमान समान...
हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावच...मुंबई  ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू...
गायीच्या दूध खरेदी दरात एक रुपयाने वाढपुणे  ः परराज्यांसह भुकटी उद्योगांकडून...