शेतात घेतलेल्या तुतीच्या पिकावरच रेशीम अळ्यांचे संगोपन करून कोषांचे उत्पादन घेतले जाते.
बातम्या
खानदेशात गव्हाच्या दरात सुधारणा
जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लोकवन गव्हाची आवक रखडत सुरू आहे. दरात किंचीत सुधारणा झाली आहे. दर प्रतिक्विंटल १८०० ते २१५० रुपयांपर्यंत आहेत. कमाल दरात क्विंटलमागे ५० ते ५५ रुपयांची सुधारणा झाल्याची माहिती मिळाली.
जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लोकवन गव्हाची आवक रखडत सुरू आहे. दरात किंचीत सुधारणा झाली आहे. दर प्रतिक्विंटल १८०० ते २१५० रुपयांपर्यंत आहेत. कमाल दरात क्विंटलमागे ५० ते ५५ रुपयांची सुधारणा झाल्याची माहिती मिळाली.
जळगाव, चोपडा, अमळनेर, धुळे, दोंडाईचा (जि. धुळे), शहादा (जि. नंदुरबार) व नंदुरबार बाजार समिती गव्हासाठी प्रसिद्ध आहे. लोकवन गव्हाची आवक अधिक होते. या हंगामात पेरणीच कमी होती. परिणामी, उत्पादनावरही सर्वत्र परिणाम झाला. अपेक्षित क्षेत्राच्या तुलनेत निम्मीच पेरणी झाली होती. जळगावात सुमारे आठ हजार व धुळे, नंदुरबारात मिळून सुमारे सहा हजार हेक्टरवर गहू होता. त्याची मळणी जवळपास आटोपली आहे. उशिरा पेरणीच्या गव्हाची मळणी या आठवड्यात पूर्ण होईल.
अनेक शेतकरी घरात साठा करीत आहेत. काही शेतकरी गहू विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. बाजारात चंदोसी, वनफोरसेव्हन प्रकारच्या गव्हाची आवक नाही. जळगाव बाजार समितीत मागील तीन दिवस प्रतिदिन १२० क्विंटल लोकवन गव्हाची आवक झाली. चोपडा येथे प्रतिदिन १५० क्विंटल, अमळनेरात २२५ क्विंटल, शहादा येथे १५० क्विंटल, धुळे, दोंडाईचा येथे मिळून २५० क्विंटल आवक प्रतिदिन झाली.
गहू विक्रीसाठी शेतकरी एकत्र
गव्हाचे दर टिकून अाहेत. मध्यंतरी २१०० रुपयांपर्यंतचे दर होते. त्यात ५० ते ५५ रुपयांनी क्विंटलमागे वाढ झाली. आवक पुढे वाढू शकते. परंतु आवकेत फारशी वाढ होणार नाही. यातच शहादा, शिरपूर व चोपडा भागांतील मोठ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बडवानी, इंदूर (मध्य प्रदेश) येथील बाजारात गव्हाची पाठवणूक केली. तेथे दर २२०० रुपयांवर आहेत, असे सांगण्यात आले.