जळगावात गहू, दादरच्या दरात सुधारणा

जळगावात गहू, दादरच्या दरात सुधारणा
जळगावात गहू, दादरच्या दरात सुधारणा

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यात गव्हासह दादर (ज्वारी)च्या दरात क्विंटलमागे प्रत्येकी १०० व १५० रुपयांची सुधारणा झाली आहे. दादरची आवक रखडत सुरू असून, प्रतिदिन १५० क्विंटल आवक झाली. तर गव्हाची स्थानिक क्षेत्रातील आवक नगण्य असून, मध्य प्रदेशातून आवक सुरू आहे. प्रतिदिन २५० क्विंटलपर्यंत गव्हाची आवक झाली. 

दादरच्या दरात मागील महिन्यात सतत घसरण सुरू होती. दर २७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले होते. संकरित प्रकारच्या दादरचे दर २४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. मार्च महिन्यात दर ३३०० रुपये प्रतिक्विंटल होते. या महिन्याच्या अखेरीस दरात सुधारणा होत गेली. आवक जशी कमी झाली तशी दरात सुधारणा झाली असून, सध्या प्रतिदिन १५० क्विंटलपर्यंत दादरची आवक होत आहे. आवक जळगाव, पाचोरा, यावल भागांतून होत आहे. दर प्रतिक्विंटल २७५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. 

गव्हाचे दर २००० ते २२५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. लोकवन गव्हाची आवक मध्य प्रदेशातील बुंदेलखंड भागातून होत आहे. तसेच राजस्थानमधील पूर्व भागातील जिल्ह्यांमधूनही गव्हाची आवक सुरू असून, प्रतिदिन २५० क्विंटलपर्यंतची आवक होत आहे. गव्हाचे दर १९०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. स्थानिक क्षेत्रातून नगण्य आवक होत आहे, असे सांगण्यात आले. 

बाजरीची आवक किरकोळ बाजार समितीत बाजरीची आवक किरकोळ स्वरूपात होत असून, प्रतिदिन २५ क्विंटलपर्यंतची आवक झाली. दर प्रतिक्विंटल किमान १९०० व कमाल २२५० रुपये असे आहेत. आवक नगण्य असल्याने बाजरीचे दर मागील आठवड्यातही स्थिर राहिले. 

मका दरांवर दबाव मका दरांवर दबाव कायम असून, थेट जागेवर किंवा शेतात खरेदीसंबंधी शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १६०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. बाजार समितीमध्ये आवक नसल्यागत स्थिती आहे. त्याची मळणी जवळपास आटोपली आहे. काही शेतकऱ्यांनी मक्‍याची साठवणूक केल्याचे सांगण्यात आले. दरात मात्र कुठलीही सुधारणा झालेली नसल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com