agriculture news in marathi By improving the gram rate Farmers of Nanded beware | Agrowon

हरभरा दर सुधारल्याने नांदेडचे शेतकरी सावध

टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 मार्च 2021

नांदेड : ‘‘केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार हरभरा विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील तीन यंत्रणांकडे सहा हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

नांदेड : ‘‘केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार हरभरा विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील तीन यंत्रणांकडे सहा हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. परंतु बाजारात हरभऱ्याला पाच हजारापर्यंत दर आहेत. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी सावध झाले आहेत. यामुळे शासकीय खरेदीकडे शेतकऱ्यांनी अद्याप हरभरा आणलेला नाही,’’ अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली. 

शेतकऱ्यांना बाजारात शेतीमालाचा दर चांगला मिळावा, यासाठी केंद्र शासन किमान हमी दरानुसार नाफेडद्वारे शेतमाल खरेदी करते. जिल्ह्यात किमान हमी दरानुसार हरभरा खरेदी करण्याची प्रक्रिया १५ फेब्रुवारीपासून सुरू झाली. यामध्ये दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन तसेच महा फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी अशा एकूण २९ ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. 

खरेदीपूर्वी शेतकऱ्यांना पीक पेरा नोंद असलेला सातबारा, आधार, बँक पासबुकची झेरॉक्स खरेदी केंद्रावर नेऊन नाव नोंदणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. यात दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या १२ केंद्रांत तीन हजार १७७, विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या चार केंद्रांत ९४५, तर महा फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या १८ केंद्रांत एक हजार ८२९ अशा एकूण पाच हजार ९५१ शेतकऱ्यांनी आजपर्यंत ऑनलाइन नोंदणी केली. 

खरेदीसाठी यंत्रणा तयार 

बाजारात ४८०० ते ४९०० पर्यंत दर आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी आणखी दर वाढतील, या आशेने हरभरा विक्रीसाठी केंद्रावर आणला नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनकडून खरेदीसाठी तयारी पूर्ण झाली आहे. दरामुळे माल आला नाही, तरी भविष्यात बाजारात दर पडले, तर खरेदीसाठी यंत्रणा तयार आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली.  

बाजारात शेतीमालाला दर चांगला मिळावा, हा शासनाचा उद्देश आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसाठी संदेश पाठविले. परंतु बाजारातील चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी अद्याप आणला नाही. परंतु आमची यंत्रणा खरेदीसाठी तयार आहे.
- सुधीर पाटील, जिल्हा पणन अधिकारी, नांदेड.


इतर ताज्या घडामोडी
पूर्व भारताच्या विकासावर भर ः पंतप्रधान...नवी दिल्ली ः देशाचा पूर्व भाग नेतृत्व करत होता,...
विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पंढरपुरात...सोलापूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना...
बाजारात गर्दी नियंत्रणासाठी नियमांची...नाशिक : कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यातील...
नेरूर येथे नारळ बागेला आगसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील नेरूर कर्याद नारूर (...
जळगावात बीटी कापसाच्या २५ लाख पाकिटांची...जळगाव :  राज्यात कापूस लागवडीत आघाडीवर...
दर्यापूर बाजार समितीत सोयाबीनला सात...अमरावती : सोयाबीन दरातील तेजीची घौडादौड कायम असून...
मंत्रिमंडळात विदर्भाचे वजन घटलेनागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख आणि वनमंत्री संजय...
नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे शेतकरी कृषी...कोल्हापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या...
 खानदेशात कांद्याची आवक वाढतच दर दबावातजळगाव :  खानदेशात गेल्या आठवड्यात लाल...
अकोला जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना...अकोला : एकीकडे केंद्र, राज्य शासन लाभार्थ्यांच्या...
दर वाढले म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन...परभणी : दर वाढले म्हणून बियाण्यासाठी राखून...
शेतकरी नियोजन पीक ः डाळिंबसध्या बाग ताणावर सोडली आहे. मळद येथील ६० एकर...
महिला शेतकऱ्यांसाठी उत्पादक कंपनीगावपातळीवरील १० शेतकरी महिला किंवा महिला शेतकरी...
सोलापुरात वाढत्या उन्हामुळे शुकशुकाटसोलापूर ः सोलापूर शहर जिल्हयात सध्या उष्ष्णतेची...
काबुली हरभऱ्याचे दर खानदेशात टिकूनजळगाव :  खानदेशात काबुली हरभऱ्याचे दर यंदा...
पणन संचालनालयाच्या सूचनांची काटेकोरपणे... नाशिक : पणन संचालनालयाने परिपत्रक काढून सलग तीन...
जलसाठा घटू लागला; ‘गिरणा’ ४७ टक्क्यांवरजळगाव : खानदेशात गेल्या काही दिवसांमध्ये रब्बी,...
कृषी सल्ला :आंबा, काजू, नारळ, वाल,...खरीप हंगामाच्या पिक लागवडीसाठी पूर्वतयारी म्हणून...
नाशिक : गोठेधारकांना परवाना नूतनीकरण...नाशिक : शासनाने ३१ ऑक्टोबर २००३ च्या...
वनशेतीसाठी उपयुक्त शिवणशिवण लाकडाचा उपयोग इंधन, फर्निचर, लॅमिनेटेड बोर्ड...