Agriculture news in marathi Improving the price of flowers and eggplants in the city | Agrowon

नगरला फ्लॉवर, वांग्यांच्या दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 जुलै 2020

 नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यात फ्लॉवर, वांग्यांच्या दरात सुधारणा झाली. भुसारची आवक जेमतेम राहिली, तर डाळिंबांच्या आवकेत काही प्रमाणात वाढ झाली आहे.

 नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यात फ्लॉवर, वांग्यांच्या दरात सुधारणा झाली. भुसारची आवक जेमतेम राहिली, तर डाळिंबांच्या आवकेत काही प्रमाणात वाढ झाली आहे.

नगर कृषी उत्पन्न  बाजार समितीत भाजीपाल्यात टोमॅटोची दर दिवसाला चाळीस ते साठ क्विंटलची आवक झाली. दर एक हजार ते दोन हजार रूपये प्रती क्विंटलला मिळाला. वांग्यांची २४ ते ३० क्विंटलची आवक होऊन दीड हजार ते चार हजार, फ्लॉवरची चाळीस ते पन्नास क्विंटलची आवक होऊन दोन हजार ते साडेतीन हजार, कोबीची पंचवीस ते तीस क्विंटलची आवक होउन एक हजार ते दिड हजार, काकडीची ३० क्विंटलपर्यत आवक होऊन आठशे ते बाराशे, गवारची आठ ते बारा क्विंटलची आवक होऊन दोन हजार ते चार हजार रुपये, घोसाळ्याची पाच ते दहा क्विंटलची आवक होऊन एक हजार ते दोन हजार रूपये दर मिळाला. 

दोडक्यांची पंधरा ते वीस क्विंटलची आवक झाली. दर दोन हजार ते साडेतीन हजार रूपये मिळाला. कारल्याची २५ ते ३५ क्विंटलची आवक होऊन एक हजार ते दोन हजाराचा दर मिळाला. बटाट्याची दर दिवसाला ३३० ते ३५० क्विंटलची आवक होऊन २ हजार ते २३००, शेवग्याची पाच ते दहा क्विंटलची आवक होऊन तीन हजार ते पाच हजार, हिरव्या मिरचीची ३० ते ३५ क्विंटलची आवक होऊन दिड हजार ते आडीच हजार, शिमला मिरचीची तीस क्विंटलपर्यत आवक होऊन दोन हजार ते चार हजार रुपयांचा दर मिळाला. मेथी, कोथिंबीर, पालक, चुका, शेपू भाजीला चांगली मागणी राहिली.

फळांत मोसंबीची दर दिवसांला सहा ते दहा क्विंटलची आवक झाली. दर  दोन हजार ते सहा हजार, डाळिंबांची २० ते ३० क्विंटलची आवक होऊन एक हजार ते सहा हजार रुपये मिळाला.
सिताफळांचीही आवक सुरु झाली आहे. त्याची दर दिवसाला चार ते  सहा क्विंटलची आवक होऊन दोन हजार ते सात हजार रुपयांचा दर मिळत आहे. भुसार मालाची आवक या आठवड्यात जेमतेम राहिली, असे बाजार समितीतून सांगण्यात आले. 


इतर बाजारभाव बातम्या
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
जळगावात मेथी २००० ते ३५०० रुपये जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये वांगी २००० ते ५००० रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात गवार २५०० ते ४००० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सोलापुरात ढोबळी मिरची, टोमॅटो दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये हिरवी मिरचीला मागणी...नाशिक : येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कांदा, बटाट्याच्या दरात सुधारणा,...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची प्रतिक्विंटल...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत काकडी ६०० ते १२०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात उडीद २५०० ते ८००० रूपयेनगरमध्ये ४५०० ते ५५०० रूपये नगर  : नगर...
नाशिकमध्ये कारले १००० ते २६६७ रूपयेनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (ता.८...
जळगावात आले ३५०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर बाजार समितीत कांद्याचे दर टिकूननगर ः नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर गेल्या पंधरा...