‘म्हैसाळ‘च्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे बेमुदत आंदोलन

‘म्हैसाळ‘च्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे बेमुदत आंदोलन
‘म्हैसाळ‘च्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे बेमुदत आंदोलन

सांगली : ‘सरकार.... सरकार... आमच्या सोरडी गावाची ऐका हो पुकार... म्हैसाळ योजनेमधून वगळले गाव... अन्याय केला सोरडी गावावर... मंत्री पुढारी आले फार... खोटं बोलले भरपूर... सरकार ... सरकार... असे भजन सादर करून सोरडी (ता. जत) गावातील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

सांगली येथील खासदार कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या निवासस्थानी सोरडी गावातील पन्नासहून अधिक शेतकऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी आमच्यावर कसा अन्याय झाला आहे, ते भजनातून मांडले. रब्बी आणि खरीप हातातून गेला. गावातील ७० टक्के आमचे बांधव ऊस तोडणी मजुरी करण्यासाठी गेले. म्हैसाळ योजनेचे पाणी शेजारी आले. वळसंग आणि शेड्याळ गावात म्हैसाळचे पाणी आले. तिथून अवघ्या दोन किलोमीटरवर आमचे गाव. तरीदेखील या योजनेतून वंचित ठेवले. वाया जाणारे पाणी दिले तरी आमचे शिवार पिकाने बहरेल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

‘‘प्यायला पाणी न्हाय...जनावरांना चारा न्हाय. शासन दरबारी आमचं गाऱ्हाणं ऐकून घ्यायला कुणीबी तयार न्हाय. दावणीची जनावरं इकायची येळ आली. आम्ही जगायचं कसं. असा प्रश्न पडलाय. त्यातंच रब्बी आणि खरीप हंगामातील पिकं वाळून गेल्याती. दोन वेळची भाकरी मिळण मुश्कील झालायं. आमचा संसार उघड्यावर पडायला लागलाय. तरीदेखील सरकारचं आमच्याकडं लक्ष न्हाय, अशी व्यथाही आंदोलकांनी सांगितली.

म्हैसाळ योजनेचे आवर्तन सोडल्यानंतर लाखो लिटर पाणी वाया जाते. तेच पाणी ओढ्याच्या मार्फत या तलावात सोडले तर वर्षभर पुरेल इतके पाणी साठेल. त्यामुळे या तलावातील गाळ काढण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. जोपर्यंत पाणी देत नाहीत, तोपर्यंत बेमुदत आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे शेतकरी म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com