agriculture news in Marathi, Inadequate fall in vegetable prices; Price increases | Agrowon

गुलटेकडी बाजारात भाजीपाल्याची आवक कमी; दरात वाढ
टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 मार्च 2019

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १०) सुमारे १४० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाल्याची आवक दिवसेंदिवस घटत असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे १० ट्रकने भाजीपाल्याच्या आवकेत घट झाली आहे. आवकेत झालेली घट आणि मागणी असल्याने कांदा, बटाटा, लसूण, आले, हिरवी मिरची, कारली, मटार, पावटा यांच्या दरात वाढ झाली होती. तर पालेभाज्यांचे वाढलेले दर स्थिर होते.

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १०) सुमारे १४० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाल्याची आवक दिवसेंदिवस घटत असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे १० ट्रकने भाजीपाल्याच्या आवकेत घट झाली आहे. आवकेत झालेली घट आणि मागणी असल्याने कांदा, बटाटा, लसूण, आले, हिरवी मिरची, कारली, मटार, पावटा यांच्या दरात वाढ झाली होती. तर पालेभाज्यांचे वाढलेले दर स्थिर होते.

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून सुमारे १० टेंपो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ३ टेंपो शेवगा, राजस्थान येथून मटार आणि गाजर प्रत्येक सुमारे १० ट्रक, कर्नाटक आणि गुजरात येथून ४ ट्रक कोबी तर भुईमूग सुमारे ५० गोणी, आणि मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी तर बंगलोर येथून आले २ टेंपो आवक झाली होती.

महाराष्ट्राच्या विविध भागांतील झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार गोणी, टॉमेटोे सुमारे ५ हजार क्रेट, कोबी ५ तर फ्लॉवर सुमारे १० टेंपो, ढोबळी मिरची ८ टेंपो, हिरवी मिरची ३ टेंपो, भेंडी सुमारे ८ टेंपो, शेवगा ३ टेंपो, तांबडा भोपळा १० टेंपो, तर कांदा नवीन सुमारे १२५ ट्रक आवक झाली होती. तसेच स्थानिकसह आग्रा, इंदूर येथून बटाट्याची ५० ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 
कांदा - ६०-८०, बटाटा : गुजरात ७०-९०, इंदूर १३०-१५०, लसूण : २००-४०० आले : सातारी ६००-६५०, बंगळूर -४००-४५०, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान -८००-१०००, टोमॅटो : १६०-१८०, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : ५००-६००, दुधी भोपळा : २००-२५०, चवळी : २००-२५०, काकडी : २००-२५०, कारली : हिरवी- ४००-५०० पांढरी ३००- ३५०, पापडी : २००-२५०, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर : ८०-१००, कोबी : १००-१२०, वांगी : २००-३००, डिंगरी : २००- २५०, नवलकोल : १२०-१४०, ढोबळी मिरची : ४००-४५०, तोंडली : कळी ३००- ३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : २५०-३००, गाजर : १००-१२०, वालवर : २५०-३००, बीट : १००-१२०, घेवडा : ४००-४५०, कोहळा : २००-२५०, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग : ६००-६५०, पावटा : ४००-५००, मटार : २६०- ३००, तांबडा भोपळा : १००-१२०, चिंच अखंड - ३००-३५०, सूरण : १८०-२००, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख तर मेथीची सुमारे ६० हजार जुड्या आवक झाली होती.पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ४००-८००, मेथी : ३००-७००, शेपू : ६००-७००, कांदापात : ५००-७००, चाकवत : ४००-६००, करडई :४००-५००, पुदिना : २००-२५०, अंबाडी : ५००-६००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ५००-७००, चुका : ४००-६००, चवळई : ५००-८००, पालक : ३००-४००, हरभरा गड्डी : ४००-६००.

फळबाजार
फळबाजारात रविवारी (ता. १०) मोसंबीची जुन्या आणि नव्या बहराची सुमारे ६० टन, संत्री ४० टन डाळिंब सुमारे १५० टन, पपई १० टेम्पो, लिंबे सुमारे २ हजार गोणी, चिकू २ हजार ५०० बॉक्स आणि गोणी, पेरू ४०० क्रेट, कलिंगड ३० टेंपो, खरबूज २० टेंपो, विविध जातींची बोरे सुमारे १०० गोणी आवक झाली होती. तर विविध द्राक्षांची सुमारे ५० टन, स्ट्रॉबेरीची सुमारे ४ टन आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३००-९००, मोसंबी : (३ डझन) : ८०-५५०, (४ डझन) : ३०-२५०, संत्रा : (३ डझन) १२०-३५०, (४ डझन) : ६०-१३०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २०-१००, आरक्ता १०-५० गणेश -५-२०, कलिंगड : ५-१२, खरबूज : १०-२२, पपई : ५-१५, चिकू : १००-६००, पेरू (२० किलो) : ४००-७००, बोरे : उमराण (१० किलो) -८०-९०, चमेली (१० किलो) १७०-१८०, चण्यामण्या ४५०- ४७०. द्राक्षे : जम्बो (१० किलो) ४५०-७००. सुपर सोनाका - ७५०-१०००, शरद सीडलेस (१०)- ३५०-५००, ताश ए गणेश - ५००-६००, स्ट्रॉबेरी-१७०-१८०(२ किलोचे पनेट)

फुलबाजार
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५-३०, गुलछडी : ८०-१२०, बिजली : ५-२०, कापरी : १०-३०, सुट्टा कागडा : १००-२००, मोगरा : ३००-६००, ऑस्टर : ८-१५, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-४०, गुलछडी काडी : २०-६०, डच गुलाब (२० नग) : २०-४०, लिलिबंडल : ५-१०, जरबेरा - १०-३०, कार्नेशियन : ४०-६०

मासळी
गणेश पेठ येथील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. १०) खोलसमुद्रातील मासळीची सुमारे १० टन, खाडीची मासळी ६०० किलो, नदीची सुमारे दीड टन आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १० टन आवक झाल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले.

दरम्यान मासळीला मागणी वाढली असून, त्या तुलनेत आवक कमी असल्याने सर्व मासळीच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत ५ ते १० टक्के वाढ झाली असल्याचेही परदेशी यांना सांगितले. तसेच उन्हाळ्यामुळे इंग्लिश अंड्याची मागणी घटल्याने शेकड्याच्या दरात ४० रुपये घट झाली आहे. मटण आणि चिकनचे दर मागच्या आठवड्याच्या तुलनते स्थिर असल्याची माहिती व्यापारी रुपेश परदेशी आणि प्रभाकर कांबळे यांनी दिली. 

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) 
पापलेट : कापरी : १८००, मोठे  १६००, मध्यम : ११००-१२००, लहान ९००-१००० भिला : ६००-७००, हलवा : ६५०-७००, सुरमई : ६५०-७००, रावस-लहान : ६००-७००, मोठे ७५०-८००, घोळ : ६५०, करली : २२०-३६०, करंदी  (सोललेली) : ३६०, भिंग ४००, पाला : लहान ६००-७०० , मोठे :११००, वाम : लहान ४८०-५२०, पिवळी मोठे  ७००-८००, काळी ३२०-३६०-, ओले बोंबील :  १६०-२००, 

कोळंबी ः लहान : २८०-३८०, मोठी : ४८०-५२०, जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ८००-९००, लॉबस्टर : १३००-१४००, मोरी : लहान १८०- २००, मोठे २८०, मांदेली : १२०, राणीमासा : १८०-२००, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ५५०-६००, 

खाडीची मासळी : सौंदाळे : २४०-२८०, खापी ३२०, नगली : लहान ३६० मोठी ५५०-६००, तांबोशी ४८०, पालू : ३२०, लेपा : लहान १८०, मोठे २४०, शेवटे : २४० बांगडा : लहान १६०-, मोठा २००-२४०, पेडवी : ८०, बेळुंजी : १६०-१८०, तिसऱ्या : २००, खुबे १४०-१६०, तारली :  १४०-१६० 

नदीची मासळी : रहू : १६०, कतला : २०, मरळ : लहान २८०, मोठी ४८०, शिवडा : २८०, चिलापी : १००, मागुर : १६०, खवली : २८०, आम्ळी : १६० खेकडे : ३२०, वाम : ६००. 

मटण : बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०. 
चिकन : चिकन : १५०, लेगपीस : १८०,जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०. 
अंडी : गावरान : शेकडा : ६८०, डझन : ९० प्रति नग : ७.५० इंग्लिश : शेकडा : ३९५ डझन : ६० प्रतिनग : ५.

इतर बाजारभाव बातम्या
परभणीत वांगी ८०० ते १५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दर स्थिरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत शेतीमालाची...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी प्रतिक्विंटल १८०० ते २२००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कोथिंबीर प्रतिशेकडा ८०० ते ३५००...औरंगाबादेत प्रतिशेकडा ८०० ते ११०० रुपये औरंगाबाद...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ५००० ते ५९००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः नवती केळीच्या दरात मागील आठवडाभरात...
नाशिकमध्ये कोथिंबीर प्रतिक्विंटल ९,६००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
गुलटेकडीत शेवगा, मटार, कैरीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
करंजाड उपबाजारात टोमॅटो लिलावास सुरवातनाशिक : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील उपबाजार...
औरंगाबादेत कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नारायणगाव उपबाजारात टोमॅटोची उच्चांकी...नारायणगाव, जि. पुणे   : जुन्नर कृषी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते ३५००...नाशिकमध्ये प्रतिक्विंटल १००० ते २२५० रुपये नाशिक...
अकोल्यात मूग सरासरी ४४५० रुपये...अकोला ः गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे...
नाशिकमध्ये भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...