दुष्काळी स्थितीमुळे भाजीपाल्याची आवक कमी; दर स्थिर

दुष्काळी स्थितीमुळे भाजीपाल्याची आवक कमी; दर स्थिर
दुष्काळी स्थितीमुळे भाजीपाल्याची आवक कमी; दर स्थिर

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ७) भाजीपाल्याची अवघी सुमारे १२५ ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. दुष्काळी परिस्थिती आणि शनिवारी (ता. ६) गुढीपाडव्यामुळे देखील भाजीपाल्याच्या आवकेत घट झाली होती. परिणामी, विविध भाजीपाल्यांसह पालेभाज्यांचे वाढलेले दर स्थिर आहेत. 

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ४ टेम्पो शेवगा, राजस्थान येथून ३ ट्रक मटार तर गाजर सुमारे ५ ट्रक, कर्नाटक आणि गुजरात येथून ४ ट्रक कोबी, कर्नाटकमधून तोतापुरी कैरी सुमारे ४ टेम्पो, बंगळूर येथून आले १ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी आवक झाली होती. 

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार गोणी, टोमॅटो सुमारे ४ हजार क्रेट, कोबी आणि फ्लॉवर प्रत्येकी सुमारे ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ टेम्पो, गाजर २ टेम्पो, तांबडा भोपळा ६ टेम्पो, काकडी १०, भेंडी ८, गवार ५ टेम्पो, चिंच अवघी १५ गोणी, तर कांदा सुमारे १०० ट्रक तर स्थानिकसह आग्रा,  इंदूर येथून बटाट्याची सुमारे ४० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :  कांदा - ७०-८५, बटाटा- ८०-१५०, लसूण - २५०-५००, आले : सातारी ५५०-६००, बंगलोर -५००-५५०, भेंडी : ३००-४००, गवार : ३००-५००, टोमॅटो - १६०-१८०, दोडका : १६०-१८०, हिरवी मिरची : ३००-६००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : १५०-२००, काकडी : १००-१५०, कारली : हिरवी ४००-४५० - पांढरी ३००-३५०, पापडी :३०० -३५०, पडवळ : ३००-३५०, फ्लॉवर : १२०-१५०, कोबी : १००-१४०, वांगी : १०० -२००, डिंगरी : २०० -२५०, नवलकोल : १०० -१२०, ढोबळी मिरची : ३५०-४००, तोंडली : कळी ३००- ३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : १८०-२००, गाजर : १००- १४०, वालवर : ३००-३५० , बीट :१२०-१४०, घेवडा : ६००-७००, कोहळा : २०० -२५०, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे :२०० -२५०, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग : ६०० -६५०, पावटा :५५० -६००, मटार : ४५०, तांबडा भोपळा १२०-१५०, चिंच अखंड ३०० -३५०, सूरण : २२०-२४०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १००-१६००. 

पालेभाज्या  पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख, तर मेथीची सुमारे ५० हजार जुड्या आवक झाली होती.  पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ८०० -१४००, मेथी : ५००-८००, शेपू : ५००-७००, कांदापात : १००० -१२००, चाकवत : ५०० -६००, करडई : ४०० -५००, पुदिना : २०० -३००, अंबाडी : ३००-३५०, मुळे : १५०-१६०, राजगिरा : ५०० -७००, चुका : ५००-८००, चवळई : ५०० -६००, पालक :४०० -६००. 

फुलबाजार  नुकत्याच झालेल्या गुढीपाडव्यानंतर विविध फुलांची आवक घटली असून, विविध फुलांच्या दरात १० ते २० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.  फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-६०, गुलछडी : १००-१५०, बिजली : ३०-१००, कापरी : २०-५०, मोगरा : २००-३००, ॲस्टर : १६-२५, (गड्ड्यांचे भाव) गुलाब गड्डी : १०-२०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : २०-४०, लिली बंडल : ३-६, जरबेरा : १०-२०, कार्नेशियन : २०-५०.

उन्हाळ्यामुळे कलिंगड लिंबाला मागणी वाढल्याने कलिंगडाच्या दरात किलोमागे २ रुपये, तर लिंबाच्या गोणी मागे १०० रुपयांनी वाढ झाली आहे. रविवारी (ता. ७) मोसंबी सुमारे ६५ टन, संत्री ५० टन, डाळिंब २५० टन, पपई १५ टेम्पो, लिंबे सुमारे दोन हजार गोणी, चिकू २ हजार डाग, पेरू ६० क्रेट्स, कलिंगड ४० टेम्पो, खरबूज २५ टेम्पो, आणि द्राक्षांची ६ ते ७ टन आवक झाली होती. तर कोकणातून हापूस आंब्याची सुमारे ३ हजार पेटी आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : २००-१०००, मोसंबी : (३ डझन) : १२०-३५०, (४ डझन) : ४०-१३०, संत्रा : (३ डझन) : १५०-४००, (डझन ४) : ५०-१५०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-७०, गणेश ५-२०, आरक्ता ५-४०. कलिंगड : ५-१२, खरबूज : १०-२०, पपई : ५-१५, चिकू : -१००-६००, पेरू (२० किलो) : ३००-४००, सफरचंद : काश्‍मीर डेलिशिअस (१५ किलो) १०००-१३००, किन्नोर (२५ किलो) २०००-२२००, द्राक्षे : जंबो (१५ किलो) ८००-१४००, सुपर सोनाका ( १५ किलो) १०००-१२००, माणिकचमन (१५ किलो) ७००-८००. आंबा (कर्नाटक) : बदाम (१ किलो) ४०-५०, तोतापुरी ३०- ४०, लालबाग २०-४०, हापूस (२ डझन) ५००-७००, पायरी (२ डझन) ३००-४००. कोकण हापूस (४-६ डझन) कच्चा १५००-२००० तयार - २०००-२५००, (५ ते ७ डझन) कच्चा २ ते ४ हजार, तयार २५०० ते ४५००

मासळी  गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात खोल समुद्रातील मासळी सुमारे ८ टन, खाडीची सुमारे ३०० किलो तर नदीच्या मासळीची सुमारे दीड टन आवक झाली होती. तर आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १२ टन आवक झाली होती. मासळीची आवक ही प्रामुख्याने पूर्व व पश्‍चिम किनारपट्टीवरून होत असून, ही आवक तुलनेने कमी आहे. परिणामी, गेल्या आठड्यातील विविध मासळीचे वाढलेले दर टिकून होते. तसेच मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे चिकन, मटण व अंड्यांचे दर देखील स्थिर होते. 

खोल समुद्रातील मासळी       (प्रतिकिलोचे भाव) :  पापलेट : कापरी : १४००, मोठे १५००, मध्यम : १०००, लहान -८००-९००, भिला : ६००-७००, हलवा : ६५०, सुरमई : ६५०-७००, रावस : लहान - ६५०-७००, मोठा - ८००, घोळ : ७५०, करली : ३२०-३६०, करंदी (सोललेली) : ३६०-४००, भिंग ४०० , पाला : लहान ६००, मोठा ८००, वाम : पिवळी लहान ४८० -५५० मोठे ८००-९००, काळी : ३६०-४००, ओले बोंबील : १२०-२००, कोळंबी ः लहान २८०-३२०, मोठी -४८०- ५५०, जंबो प्रॉन्स : १४००, किंग प्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १४००, मोरी : लहान २००, मोठी ३२०, मांदेली : -१२०-१४०, राणीमासा : १८०-२००, खेकडे : -२००-२८०, चिंबोऱ्या : ५००-६००, 

खाडीची मासळी  सौंदाळे : २८०, खापी - २८०-३२०, नगली : लहान ४००, मोठी ५५०, तांबोशी ४८०, पालू : २४०, लेपा : लहान लहान १००, मोठे २००-२४०, शेवटे : २८०, बांगडा : लहान १६०, मोठा -२००-२४०, पेडवी : १००, बेळुंजी : १६०-२००, तिसऱ्या : १८०-२००, खुबे १२०-१४०, तारली : १६० 

नदीची मासळी  रहू :१४० -१६०, कतला : -१६०-१८०, मरळ : २८०-३२०, शिवडा : २४०, चिलापी : ८०, मांगुर : १४०, खवली : २००, आम्ळी : १००-१२० खेकडे : २८०, वाम : ५२० .  मटण  बोकडाचे : ४८० , बोल्हाईचे: ४८० , खिमा : ४८० , कलेजी : ५२०.  चिकन  चिकन : १६०, लेगपीस : १९०, जिवंत कोंबडी : १३०, बोनलेस : २६०.  अंडी  गावरान : शेकडा : ६५०, डझन : ९० प्रति नग : ७.५० इंग्लिश : शेकडा : ३३८ डझन : ३८ प्रतिनग : ४  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com