बीड जिल्ह्यात १८ केंद्रांवर हमीभावाने शेतमालाची खरेदी सुरू

बीड जिल्ह्यात १८ केंद्रांवर हमीभावाने शेतमालाची खरेदी सुरू
बीड जिल्ह्यात १८ केंद्रांवर हमीभावाने शेतमालाची खरेदी सुरू

बीड : शेतमालाची हमीभावाने खरेदीची प्रक्रिया बीड जिल्ह्यातील १८ केंद्रांवरून सुरू करण्यात आली आहे. सोयाबीनची केवळ एका केंद्रावर नाममात्र ३ क्‍विंटल तर मूग, उडदाची मात्र बहुतांश केंद्रांवरून खरेदीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शासनाने हमीभावाने शेतमाल खरेदी केंद्रे सुरू करण्याचे ठरविल्यानंतर बीड जिल्ह्यात जवळपास १८ केंद्रे सुरू करण्यात आली. आधी नोंदणी व त्यानंतर खरेदीची प्रक्रिया सुरू करण्याचे काम संबंधित यंत्रणेकडून केले गेले. २४ ऑक्‍टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान ही खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, घाटनांदूर, धारूर, शिरूर, बीड, केज, माजलगाव, गेवराई, पाटोदा, पारनेर, चौसाळा, कडा, परळी, धर्मापुरी, वडवणी, लिंबागणेश, फुलसांगवी, बर्दापूर आदी ठिकाणी सोयाबीन, उडीद, मुगाची खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली.

१९ नोव्हेंबरअखेरपर्यंत या अठराही खरेदी केंद्रांवरून मुगाची ६६२ शेतकऱ्यांकडून २७२६ क्‍विंटल ८४ किलो खरेदी करण्यात आली. दुसरीकडे ३१ शेतकऱ्यांकडून उडदाची ११३ क्‍विंटल १ किलो खरेदी केली गेली. सोयाबीनची केवळ गेवराईच्या खरेदी केंद्रावरून एका शेतकऱ्याकडून ३ क्‍विंटलचीच खरेदी केली गेली आहे. खरेदी करण्यात आलेला सर्वच्या सर्व २७२६ क्‍विंटल ८४ किलो मूग व ११३ क्‍विंटल १ किलो उडीद गोदामात साठविण्यात आला आहे.

उडदाची पारनेर, गेवराई, घाटनांदूर व शिरूर केंद्रावर तर मुगाची बर्दापूर, फुलसांगवी, धर्मापुरी, परळी, गेवराई, माजलगाव, केज, बीड, शिरूर,धारूर, घाटनांदूर या अकरा केंद्रांवरच खरेदी करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com