Agriculture news in Marathi Inauguration of Bamboo Workshop at Konkan Agricultural University | Agrowon

कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे उद्घाटन

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 सप्टेंबर 2020

जगभरात दरवर्षी १८ सप्टेंबर हा दिवस जागतिक बांबू दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधत येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत वनशास्त्र महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर बांबू व काष्ठ कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८ सप्टेंबर हा दिवस जागतिक बांबू दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधत येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत वनशास्त्र महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर बांबू व काष्ठ कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

जागतिक बांबू दिनाच्या निमित्ताने वनशास्त्र महाविद्यालयात पारंपरिक कार्यशाळेत नवीन उपकरणे व यंत्रे बसवून आधुनिक अशी बांबू व काष्ठ कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. या कार्यशाळेत बांबूपासून अगरबत्ती तयार करण्याची यंत्रे तसेच बांबू, लाकूड, प्लायवूडवर संगणकीय कोरीवकाम करणारे यंत्र स्थापन करण्यात आले आहे. या कार्यशाळेतून बांबूचे आकाशकंदील, पेले, मोबाईल स्टँड, लॅम्पशेड, पेनस्टँड, फ्लॉवरपॉट तसेच इतर अनेक शोभेच्या हस्तकलाकृती तयार करण्यात येत होत्या. त्या आता अधिक सुबक आणि नक्षीदार होण्यास मदत होणार आहे. तसेच खुर्च्या, टेबल, स्टूल यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यात येणार आहे.

कुलगुरूंनी विद्यापीठातील सर्व महाविद्यालये, संशोधन केंद्रे तसेच कार्यालयांना त्यांच्या आवश्यकतेच्या वस्तू प्राथमिकतेने या कार्यशाळेतूनच खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वनशास्त्र महाविद्यालयाने अगदी अल्पावधीतच केलेल्या प्रगतीचे त्यांनी कौतुक केले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कार्यानुभव देऊन त्यांच्यामध्ये उद्योजकता वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच शेतकरी, उद्योजक आणि कारागीर यांच्यासाठी विविध प्रकारची प्रशिक्षणे आयोजित करण्यात येतात.माणगा बांबूवरील संशोधनात वनशास्त्र महाविद्यालयाने आघाडी घेतली आहे.


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...
पुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...
वाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...
कृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...
लाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...
माथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...
जालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना  : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...
कापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...
रत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...
नांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...
मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...
देवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...
पाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...
उद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...
भोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...
सोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...
पंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
विदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...
‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...
रब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...