‘गोट’ बँकेचे पशुसंवर्धन मंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्‌घाटन

Inauguration of 'Goat Bank' at Animal Husbandry Ministers tomorrow
Inauguration of 'Goat Bank' at Animal Husbandry Ministers tomorrow

अकोला ः अकोला शहरापासून जवळच असलेल्या सांगवी मोहाडी या ठिकाणी ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराचे साधन म्हणून वितरित करण्यासाठी शेळ्यांची बँक स्थापन केली जात आहे. या उपक्रमाचे उद्‌घाटन शनिवारी (ता. २९) राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, यशोमती ठाकूर, पालकमंत्री बच्चू कडू, आमदार नितीन देशमुख, कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे, अशी माहिती गोट बँक ऑफ कारखेडाचे संस्थापक नरेश देशमुख यांनी दिली.  

येथे बुधवारी (ता. २६) श्री. देशमुख यांनी पत्रकारांना याबाबत माहिती देताना म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील बचत गटातील गरजू महिलांना या उपक्रमातून उस्मानाबादी जातीची शेळी व त्यासोबत दोन पिल्ले दिली जाईल. यानंतर संबंधित महिलेने ४० महिन्यांपर्यंत शेळीचे पालनपोषण करावे लागेल. या कालावधीत शेळीचे किमान चार वेत होतील. प्रत्येक वेतातील एक पिल्लू या गोट बँकेकडे परत द्यावे लागेल. त्यानंतर सर्व पिल्ले व बकरी ही त्या महिलेच्या मालकीची होईल. त्यासाठी बँकेप्रमाणे नोंदणी, करारसुद्धा कंपनी व संबंधित लाभार्थ्यांमध्ये केला जाईल. शेळीचा विमा सुद्धा काढण्यात येईल.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com