पशुवैद्यक आणि विज्ञान संस्थेत शेळीपालन प्रशिक्षणाचे उद्‍घाटन

पशुवैद्यक आणि विज्ञान संस्थेत शेळीपालन प्रशिक्षणाचे उद्‍घाटन

अकोला  ः स्थानिक स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेत आधुनिक शेळीपालन प्रशिक्षणाचे उद्‍घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. एम. मानकर यांच्या हस्ते झाले. या वेळी सहयोगी अधिष्ठाता डाॅ. विलास आहेर, कार्यक्रम समन्वयक डॉ. गिरीश पंचभाई, डॉ. दिलीप बदुकले, डॉ. कुलदीप देशपांडे आदी प्रमुख म्हणून उपस्थित होते.  शेतकरी, पशुपालक, बेरोजगारापर्यंत शेळीपालनातील अद्ययावत माहिती पोचविण्याच्या उद्देशाने माफसू अंतर्गत कार्यरत असलेल्या या संस्थेत पाच दिवसांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.  डॉ. मानकर यांनी मार्गदर्शनात, शेळीपालन हा फक्त शेतीस पूरक व्यवसाय राहिलेला नसून तो एक स्वतंत्र व्यवसाय झालेला आहे. वाढती लोकसंख्या, आहारात मांसाहाराचे महत्त्व, शेळीच्या मांसास असलेली मागणी, दुधातील औषधी गुण याची सविस्तर माहिती दिली. या प्रशिक्षणात २० पेक्षा अधिक मार्गदर्शक शेळीपालनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमासाठी यू. आर. बढे, ए. एम. बळवंत, डॉ. नितीन इंदुरकर यांनी पुढाकार घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com