कऱ्हाड येथे कृषी महोत्सवाचे उद्‌घाटन

कऱ्हाड येथे कृषी महोत्सवाचे उद्‌घाटन
कऱ्हाड येथे कृषी महोत्सवाचे उद्‌घाटन

कऱ्हाड, जि. सातारा : येथे कृषी विभाग व बाजार समितीच्या वतीने कृषी प्रदर्शनांतर्गत आयोजित कृषी महोत्सवाचे उद्‌घाटन शनिवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या हस्ते झाले.

या वेळी राज्यमंत्री खोत म्हणाले, शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग पावले टाकत आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांची माहिती होण्यासाठी कृषी महोत्सव उपयोगी पडत आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल बांधावर जावून व्यापाऱ्यांनी खरेदी करावा, अशी व्यवस्था यापुढील काळात करण्यात येईलय

या वेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सभापती मोहनराव माने, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कृषी संचालक विजय घावटे, अनिल बनसोडे, विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांबाळे, जिल्हा कृषी अधिकारी सुनील बोरकर, कृषी विकास अधिकारी विनायक पवार, प्रांताधिकारी हिंम्मत खराडे, तहसीलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ उपस्थित होते.

समाजमंदिर बांधण्याएेवजी गावोगावी शेतकऱ्यांसाठी कोल्डस्टोरेज, वेअरहाउस बांधल्यास शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येतील. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. - सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com