महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना : राज्यपाल

महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उदघाटन
महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उदघाटन

मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या धर्तीवर बचत गटांची उत्पादने आता महालक्ष्मी ई-सरस या मोबाईल ॲप, तसेच वेबसाइटवर उपलब्ध होणार आहेत. बचत गटांना जागतिक बाजारपेठ मिळवून देणाऱ्या या ई - कॉमर्स व्यासपीठाचे अनावरण करताना प्राथमिक टप्प्यात या ॲपवर बचत गटांची ५० उत्पादने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या माध्यमातून महिला बचत गट चळवळीला तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला. 

बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर बुधवारी (ता. २३) बचत गट आणि ग्रामीण कारागिरांच्या उत्पादनांच्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे राज्यपाल श्री. राव यांच्या हस्ते आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन झाले. या वेळी ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता उपस्थित होते. 

राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, की गेल्या पाच वर्षांमध्ये महालक्ष्मी सरस अंतर्गत महिला बचत गटांनी लक्षणीय प्रगती केली आहे. देशाच्या आर्थिक विकासात सेवा, उत्पादन, कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. महिला बचत गटांनी, आता कृषी व ग्रामीण उत्पादनांसोबत इन्शुरन्स, बँकिंग आदी सेवा क्षेत्रांतदेखील यावे. शासनाने याच ठिकाणी प्रदर्शनाला जोडून ज्ञान कौशल्य केंद्र सुरू करावे. त्या ठिकाणी महिलांना कौशल्य शिक्षण आणि शासनाच्या योजनांची माहिती द्यावी. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com