Agriculture news in Marathi, Inauguration of Personal Skills Development Training in Amadapur | Agrowon

वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षणाचे अमडापूरमध्ये उद्‌घाटन

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

अकोला ः केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत व छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्‍य विकास अभियानांतर्गत अमडापूर (ता. चिखली, जि. बुलडाणा) येथील सौ. प्रमिलाताई तेजराव देशमुख कृषी तंत्र विद्यालयात वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण घेतले जात आहे. प्रशिक्षणाचे नुकतेच उद्‌घाटन संस्थेचे अध्यक्ष ॲड. अशोकराव देशमुख, उपाध्यक्ष वल्लभराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी कॉलेजचे प्राचार्य पंकज कपाटे, प्रशिक्षिका माधुरी आवटे, प्रशिक्षण समन्वयक श्रीकृष्ण काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

अकोला ः केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत व छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्‍य विकास अभियानांतर्गत अमडापूर (ता. चिखली, जि. बुलडाणा) येथील सौ. प्रमिलाताई तेजराव देशमुख कृषी तंत्र विद्यालयात वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण घेतले जात आहे. प्रशिक्षणाचे नुकतेच उद्‌घाटन संस्थेचे अध्यक्ष ॲड. अशोकराव देशमुख, उपाध्यक्ष वल्लभराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी कॉलेजचे प्राचार्य पंकज कपाटे, प्रशिक्षिका माधुरी आवटे, प्रशिक्षण समन्वयक श्रीकृष्ण काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

अमडापूर परिसरातील गावांमधील तरुणांना ‘गुणवत्ता बियाणे उत्पादक’ या विषयाचे दोन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जात असून यात बीजोत्पादनाविषयी सखोल मार्गदर्शन केले जात आहे. तरुण-तरुणींना शेतीविषयक नवनवीन घटकांविषयी प्रशिक्षण देऊन त्यांचे ज्ञान व कौशल्य वाढविण्यात येणार आहे. यामुळे रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. 

या वेळी बोलताना ॲड. देशमुख म्हणाले, ‘‘पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून युवकांनी कृषी क्षेत्रात स्वतःची प्रगती करावी. बेरोजगारीवर मात करून उद्योजकतेच्या वा नोकरीच्या संधी शोधाव्यात. हा कोर्स केवळ प्रमाणपत्रासाठी न करता आपल्यातील कौशल्य वाढवावे.’

वल्लभराव देशमुख म्हणाले, ‘‘आज शेतीमध्ये तरुणांना प्रचंड संधी आहे. शेतीचे क्षेत्र सातत्याने विस्तारत आहे. बियाणे जगतात तर अधिक सजगता हवी. आपण शेतकऱ्याला चांगले बियाणे पुरविले तर तो चांगले पिकवेल. तरुणांनी आपल्यातील कौशल्यांचा वापर करून शेतकऱ्यांना मदत करावी. उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा.’’

या वेळी प्राचार्य कपाटे यांनी उपक्रमांविषयी तर प्रशिक्षिका माधुरी आवटे यांनी या प्रशिक्षणाविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. किरण डुकरे यांनी केले.


इतर ताज्या घडामोडी
पदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
महात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून...नगर  ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांमध्ये `कोरोना`...पुणे : निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला जेमतेम २८...
केळी पिकवून विकण्यासाठी अखेर...परभणी : ‘लॅाकडाऊन’मुळे केळीच्या दरात मोठी घसरण...
कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी (ता.५) सायंकाळी...
जनावरांतील उष्माघाताचे नियंत्रणउन्हाच्या संपर्कात आल्यामुळे जनावरांच्या शरीराचे...
अकोल्यात भाजीपाला, फळविक्रीची ११०...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील...
‘वीज दर कपातीत शेतकऱ्यांवरील अन्याय दूर...अकोला ः राज्य वीज नियामक आयोगाने नुकतीच उद्योग,...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात फुले...नांदेड : ‘लॅाकडाऊन’मुळे नांदेडसह अन्य ठिकाणच्या...
फूल विक्रीचा व्यवसाय डबघाईस; फेकून...शिरपूरजैन, जि. वाशीम : येथील फूल उत्पादक शेतकरी...
बेदाणा निर्मितीसाठी आवश्यक रसायने...नाशिक : द्राक्षापासून बेदाणा निर्मितीसाठी...
नाशिक जिल्ह्यात बेदाणा निर्मितीच्या...नाशिक : ऐन द्राक्ष हंगामाच्या अंतिम टप्प्यात...
मराठवाड्यात फळे, भाजीपाल्याची ८१ हजार...औरंगाबाद : एकीकडे दररोज सकाळीच भरणाऱ्या किरकोळ...
माळीनगरमध्ये आता नीरापासून गुळ उत्पादन लवंग, जि. सोलापूर : सध्या नीरा उत्पादनाचा हंगाम...
आरोग्य कर्मचाऱ्यासांठी सुरक्षेची पूर्ण...नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘कोरोना’...
अमरावती बाजार समितीची ३२ अडत्यांवर...अमरावती ः किरकोळ भाजी विक्री न करण्याचे आदेश...
‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा...मुंबई : ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा,...
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे...सोलापूर : कोरोना विषाणु संसर्गाच्या...
इस्लामपूरकरांना भाजीपाल्यासह साखरवाटप नवेखेड, जि. सांगली : बोरगाव (ता. वाळवा)...
राज्यातील अतिरिक्त १० लाख लिटर दूध...संगमनेर, जि.नगर : कोरोना विषाणूचा...