राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे उद्‌घाटन

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री पशुपती कुमार पारस यांच्या हस्ते ऑनलाइन उद्‍घाटन झाले. नाशिकमधील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी, अश्‍वमेध इंजिनिअर्स आणि पुण्यातील मायक्रोटेक फूट टेस्टिंग लॅब्रोटरी या तीन प्रकल्पांचा समावेश आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री पशुपती कुमार पारस यांच्या हस्ते ऑनलाइन उद्‍घाटन झाले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यास उपस्थित होत्या. उद्‍घाटन केलेल्या प्रकल्पांमध्ये फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी चळवळीला आयाम देणाऱ्या नाशिकमधील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी, अश्‍वमेध इंजिनिअर्स आणि पुण्यातील मायक्रोटेक फूट टेस्टिंग लॅब्रोटरी या तीन प्रकल्पांचा समावेश आहे. सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीने स्थापन केलेल्या कृषी प्रक्रिया क्लस्टरमध्ये मंत्रालयाने ५ अन्न प्रक्रिया युनिट मंजूर केले आहेत. ४९ कोटी ८९ लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून त्यात २० कोटी २१ लाख रुपयांच्या अनुदानाचा समावेश आहे. आतापर्यंत या युनिटना १४ कोटी ५७ लाख रुपये देण्यात आले आहेत. या पाच युनिटमुळे ८ हजार ३७५ जणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त होणार आहे. शिवाय परिसरातील १२ हजार ५०० शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.  महाराष्ट्राच्या जोडीला उत्तराखंड आणि हरियानातील आणखी तीन अशा एकूण सहा अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे उद्‍घाटन श्री. पारस यांनी केले आहे. उद्‌घाटन झालेले प्रकल्प ७६ कोटी ७६ लाख रुपये खर्चाचे आहेत. केंद्रीय मंत्रालयाने या प्रकल्पांसाठी २४ कोटी १९ लाख रुपयांचे अनुदान दिले आहे. या प्रकल्पांमुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीच्या जोडीला शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com