agriculture news in marathi Inauguration of three food processing projects in the state | Page 2 ||| Agrowon

राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 सप्टेंबर 2021

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री पशुपती कुमार पारस यांच्या हस्ते ऑनलाइन उद्‍घाटन झाले. नाशिकमधील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी, अश्‍वमेध इंजिनिअर्स आणि पुण्यातील मायक्रोटेक फूट टेस्टिंग लॅब्रोटरी या तीन प्रकल्पांचा समावेश आहे.

नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री पशुपती कुमार पारस यांच्या हस्ते ऑनलाइन उद्‍घाटन झाले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यास उपस्थित होत्या. उद्‍घाटन केलेल्या प्रकल्पांमध्ये फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी चळवळीला आयाम देणाऱ्या नाशिकमधील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी, अश्‍वमेध इंजिनिअर्स आणि पुण्यातील मायक्रोटेक फूट टेस्टिंग लॅब्रोटरी या तीन प्रकल्पांचा समावेश आहे.

सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीने स्थापन केलेल्या कृषी प्रक्रिया क्लस्टरमध्ये मंत्रालयाने ५ अन्न प्रक्रिया युनिट मंजूर केले आहेत. ४९ कोटी ८९ लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून त्यात २० कोटी २१ लाख रुपयांच्या अनुदानाचा समावेश आहे. आतापर्यंत या युनिटना १४ कोटी ५७ लाख रुपये देण्यात आले आहेत. या पाच युनिटमुळे ८ हजार ३७५ जणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त होणार आहे. शिवाय परिसरातील १२ हजार ५०० शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. 

महाराष्ट्राच्या जोडीला उत्तराखंड आणि हरियानातील आणखी तीन अशा एकूण सहा अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे उद्‍घाटन श्री. पारस यांनी केले आहे. उद्‌घाटन झालेले प्रकल्प ७६ कोटी ७६ लाख रुपये खर्चाचे आहेत. केंद्रीय मंत्रालयाने या प्रकल्पांसाठी २४ कोटी १९ लाख रुपयांचे अनुदान दिले आहे. या प्रकल्पांमुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीच्या जोडीला शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.


इतर अॅग्रोमनी
आयात उडदाला ग्राहक मिळेना पुणे : देशात यंदा उडीद उत्पादनात घट झाली मात्र...
तुरीचे दर स्थिरावले; नवीन तूर पुढील...पुणे : देशातील नवीन तूर डिसेंबरपासून बाजार येणार...
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
कापूस उत्पादक देशांमध्ये पुरवठा २०...जळगाव : जगात कापसाचा मोठा तुटवडा तयार होत आहे....
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
धनत्रयोदशीला जळगावात ३० किलो सोने विक्रीजळगाव : जळगावची केळी व अस्सल सोन्यासाठी सुवर्ण...
जगभरात कापसाचे दर चढेच राहतीलपुणे : जागतिक कापूस वापरात होणारी वाढ, कमी शिल्लक...
तुरीला हवा हमीभाव खरेदीचा आधारपुणे : पुढील महिन्यापासून नवीन तुरीची बाजारात आवक...
दिवाळीमुळे हळदीला उठावपुणे : दिवाळीमुळे हळदीच्या मागणीत वाढ झाली आहे....
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
खाद्यतेलाच्या दराऐवजी सोयाबीन दरात मोठी...पुणे : निवडणुका आणि सणांच्या पार्श्‍वभूमीवर...
मोदीजी, तुमच्यासारख्या व्यक्तीकडून ही...अहमदाबाद, गुजरात : खरिपातील तेलबिया बाजारात...
मागणीमुळे कापसाला यंदा दराची झळाळीपुणे : कोरोनानंतरच्या काळात वाढलेली मागणी आणि...
खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे मोहरीच्या...पुणे : खाद्यतेलाच्या वाढत्या दर आणि...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
भारतीय साखरेसाठी यंदा ‘फिलगुड’गेल्या महिन्याच्या कालावधीत साखर उद्योगासाठी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
‘एम’ अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील...पुणे ः देशपातळीवर कृषी निविष्ठा निर्मिती...
भारतात होणारी सोयापेंड निर्यात...पुणे : भारत सरकारने जणुकीय सुधारित सोयापेंड...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....