मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
ताज्या घडामोडी
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूक
नंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित दर सध्या मिळत नसल्याचे चित्र आहे. उष्णता वाढत असल्याने व्यापारी खरेदीसंबंधी अडवणूक करीत असून, किमान साडेचार रुपये प्रतिकिलोचा दर मिळावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. पीक अंतिम स्थितीत असतानाच उष्णतेमुळे मागणी कमी असल्याचे कारण व्यापारी सांगत आहेत.

पपई दरांचा तिढा डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात मिळून १०-१२ वेळेस निर्माण झाला. शेतकऱ्यांमध्ये सतत दरांबाबत ओरड सुरू होती. खरेदी राजस्थान, दिल्ली व मध्य प्रदेशातील व्यापारी शहादा, शिंदखेडा व नंदुरबारमधील एजंट, मध्यस्थांच्या माध्यमातून करीत होते. दरांचा तिढा सतत सुरू राहिल्याने नंदुरबार, शहादा भागातील शेतकऱ्यांची संघर्ष समिती तहसीलदार यांनी स्थापन केली होती. या समितीसह बाजार समिती प्रशासन व व्यापारी किंवा खरेदीदार यांची अनेकदा झाली. पणदरांचा तिढा पुन्हा निर्माण झाला. सध्या पपईची रोज १२ ते १६ ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) आवक शहादा, तळोदा भागांत सुरू आहे. नंदुरबारात पीक जवळपास संपले आहे. शहादा व तळोदामधील सातपुडा पर्वतालगतच्या भागात पीक काही ठिकाणी आहे. उष्णतेमुळे फळांचा दर्जा हवा तसा मिळत नाही.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर व शिंदखेडा भागांतही पपईचे पीक जवळपास संपले आहे. फळांचा दर्जा चांगला नसल्याचे सांगून व्यापारी थेट शेतातून फक्त दोन ते अडीच रुपये प्रतिकिलो दरात खरेदी करीत आहेत. काही खरेदीदार कमाल तीन रुपये प्रतिकिलोचा दर देत आहेत. पीक अंतिम टप्प्यात असल्याने अनेकांनी पीक काढले आहे. यामुळे निम्मेपेक्षा अधिक शेतकरी दरांबाबत तक्रारीसाठी पुढे येत नसल्याची स्थिती आहे.
- 1 of 1022
- ››