Agriculture news in marathi Include papaya in crop insurance scheme | Page 2 ||| Agrowon

`पपईचा पिकविमा योजनेत समावेश करा`

टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

जळगाव ः पपई पिकात अनेक रोगांच्या समस्या व नैसर्गिक आपत्तीचे संकट असते. यामुळे या पिकाचा समावेश फळ पीकविमा योजनेत करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

जळगाव ः खानदेशात कांद्यापाठोपाठ पपईचे क्षेत्र आहे. नंदुरबार जिल्हा पपईसाठी प्रसिद्ध असून, या जिल्ह्यात क्षेत्र वाढून ते पाच हजार हेक्टरपर्यंत पोचले आहे. पपई पिकात अनेक रोगांच्या समस्या व नैसर्गिक आपत्तीचे संकट असते. यामुळे या पिकाचा समावेश फळ पीकविमा योजनेत करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

यासंदर्भात शेतकरी प्रकाश पाटील व इतरांनी कृषिमंत्री आणि इतर प्रशासनातील मंडळीला निेवेदन दिले आहे. पपईचे क्षेत्र खानदेशात वाढले आहे. पूर्वी फक्त चार ते पाच हजार हेक्टरवर पपई असायची. शासनाने अलीकडे प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी पिकाचा फळ पीक विमा योजनेत समावेश केला आहे. असाच समावेश पपईचादेखील करायला हवा. पपईवरही विषाणूजन्य रोग येतात. विषम वातावरणामुळे अनेकदा पीक काढून फेकावे लागते. शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान होत असते. 

नंदुरबार जिल्ह्यात पाच हजार हेक्टरवर पपई आहे. जळगावातही सुमारे चार हजार आणि धुळ्यातही सुमारे साडेतीन हजार हेक्टरवर पपई आहे. खानदेशात एकट्या शहादा तालु्क्यात यंदा ३३९५ हेक्टरवर पपईचे पीक आहे. जळगावात चोपडा, यावल, रावेर हे तालुके पपई लागवडीत आघाडीवर असतात. पपईला विमा संरक्षण मिळाले, तर शेतकऱ्यांना पिकासंबंधी हमी, विश्वास तयार होईल. नुकसान कमी होईल, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. 

पपईला विषाणूजन्य रोगांचा विळखा असतो. लाखो रुपये किडनाशकांवर खर्च करावे लागतात. अनेकदा व्यापारी मनमानी करून नुकसान करतात. यामुळे पीक परवडत नाही. पिकाचा समावेश विमा योजनेत करायला हवा. 
- राकेश पाटील, शेतकरी, बामखेडा (जि.नंदुरबार) 


इतर ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...