नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
ताज्या घडामोडी
घशातील स्त्रावासह रक्ताच्या नमुन्यांद्वारे तपासणी...
सोलापूर जिल्ह्यातील ३८८ कोंबड्यांच्या रक्ताचे, विष्ठेचे आणि कोंबड्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले आहेत. तपासणीसाठी हे नमुने आता औंध (पुणे) येथील प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहेत.
सोलापूर : राज्यात आलेल्या बर्ड फ्लू साथीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागही अलर्ट झाला असून, जिल्ह्यातील ३८८ कोंबड्यांच्या रक्ताचे, विष्ठेचे आणि कोंबड्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले आहेत. तपासणीसाठी हे नमुने आता औंध (पुणे) येथील प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहेत.
पंढरपूर तालुक्यातील दोन, उत्तर सोलापूर, माळशिरस, सांगोला, मोहोळ आणि माढा तालुक्यातील प्रत्येकी एक अशा एकूण सात गावांमधील ३८८ कोंबड्यांचे नमुने घेतले आहेत. त्यामध्ये १०८ नमुने रक्ताचे, १३८ नमुने विष्ठेचे आणि १४२ नमुने कोंबड्यांच्या घशातील आहेत. बर्ड फ्लूचा सामना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रत्येक तालुक्यासाठी एक पथक नियुक्त केले आहे.
एका पथकात सहा तज्ज्ञ पशुवैद्यकांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोंबड्यांचा कुठे मृत्यू झाल्यास त्याची माहिती प्रशासनाला कळविण्यासाठी हेल्पलाइन विकसित करण्यात येत आहे. नेहरूनगर येथील कुक्कुटपालन केंद्रात बर्ड फ्लू नियंत्रण कक्षही सुरू झाला आहे.
परदेशी पक्ष्यांसह अन्य पक्ष्यांवर लक्ष
जिल्ह्यात उजनी, हिप्परगा, होटगी, कुरनूर या धरणांवर, तलाव, पाणथळ ठिकाणे, महत्त्वाच्या पाणवठ्यांवर परदेशी पक्षी येऊ लागले आहेत. या शिवाय चिमणी, कावळा, कबूतर, पारवा यासह इतर स्थानिक पक्षांच्या माध्यमातून बर्ड फ्लूची लागण जिल्ह्यात होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याच्या दृष्टीने वन विभाग पशुसंवर्धन विभागाकडून आवश्यक ती मदत घेत असल्याचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यात ३५ लाख कोंबड्या
सोलापूर जिल्ह्यात सध्या चिकनच्या ८ लाख ब्रॉयलर कोंबड्या, अंडी देणाऱ्या लेअरच्या १४ लाख कोंबड्या, तर १३ लाख देशी व संकरित कोंबड्या सध्या सोलापूर जिल्ह्यात आहेत. बॉयलर व लेअरच्या कुक्कुटपालनासाठी सोलापूर जिल्ह्यात बार्शी, सांगोला आणि माळशिरस तालुके आघाडीवर आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने या तिन्ही तालुक्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
- 1 of 1028
- ››