Agriculture News in Marathi Including increasing the area of irrigation Emphasis on quality rehabilitation | Page 3 ||| Agrowon

सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार पुनर्वसनावर भर 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 सप्टेंबर 2021

राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच आता पूर्णेच्या खोऱ्यातील टेंभा गावाजवळ पेढी नदीवर पेढी बॅरेज उपसा सिंचना योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच आता पूर्णेच्या खोऱ्यातील टेंभा गावाजवळ पेढी नदीवर पेढी बॅरेज उपसा सिंचना योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. विविध प्रकल्पांना चालना देऊन जिल्ह्यातील सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. 

चांदूर बाजार तालुक्यातील राजुरा गावाजवळील राजुरा नाल्यावरील लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामासाठी १९३ कोटी ८१ लाख रुपये किंमतीला सुधारित प्रशासकीय मान्यता नुकतीच मिळाली. त्याचबरोबर आता पेढी उपसा सिंचन योजनेच्या ३६१ कोटी ६१ लक्ष रूपयांच्या प्रकल्पाला मान्यता मिळाल्याने ही महत्वाची कामे वेग घेणार आहेत. प्रकल्प उभारताना ते काम दर्जेदार होण्यासह पुनर्वसनाची कामेही उत्तम व्हावीत, असे उद्दिष्ट आहे. दर्जेदार पुनर्वसनासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे, असे राज्यमंत्री कडू यांनी सांगितले. 

प्रकल्पाची वैशिष्ट्ये 
तापी खोऱ्यातील पूर्णा उपखोऱ्यात टेंभा गावाच्या पूर्वेस पेढी नदीवर पेढी बॅरेज उपसासिंचन योजना प्रस्तवित करण्यात आली. या बॅरेजची एकूण साठवण क्षमता ४.६५ दलघमी इतकी आहे. जिवंत पाणीसाठा ४.६० असून मृत पाणीसाठा ०.०५ दलघमी आहे. बॅरेजची लांबी १२० मी. इतकी असून १२६.५० मीटर आकाराचे उभी उचल पद्धतीने आठ दरवाजे राहणार आहेत.

बॅरेजच्या पायाच्या ठिकाणी परागम्य मऊ भूस्तर असल्याने बॅरेज डिफॉर्गम वॉलसह रूफ फाउंडेशनवर प्रस्तावित आहे. डाव्या तिरावर १०० मी. लांबीचा व उजव्या तिरावर ८१ मीटर लांबीचा माती भराव प्रस्तवित आहे. दोन्ही बाजूस महत्तम उंची ९.५० मीटर इतकी आहे. प्रकल्पाचा लाभ सात गावांतील २ हजार २३२ हेक्टर शेतीला, तसेच पेयजल व मत्स्य व्यवसायाला मिळणार आहे. 


इतर बातम्या
अनुदानित हरभरा बियाणे उपयोगात आणावे :...नाशिक : ‘‘राज्यात २४ ऑक्टोबरपर्यंत हरभरा प्रमाणित...
नांदेड जिल्हा बॅंकेची मदार २३०...नांदेड : नांदेड जिल्हा बॅंकेत कर्मचाऱ्यांची वानवा...
किसान रेल्वेला सोलापुरातून प्रतिसादसोलापूर ः मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून किसान...
खानदेशात रब्बीसाठी पीककर्जाचे वितरण सुरूजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची तयारी सुरू आहे....
धर्माबादेत डीएपीची खताची कृत्रीम टंचाईनांदेड : धर्माबाद येथील कृषी सेवा केंद्र चालक...
जळगाव जिल्ह्यात पाणीपातळीत वाढजळगाव ः नवरात्रोत्सवानंतर जिल्ह्याला परतीच्या...
सोलापूर जिल्ह्यात यंदा हंगामात तीन लाख...सोलापूर ः जिल्ह्यातील गाळप हंगाम सुरू झाला आहे....
हमीभाव खरेदी केंद्राचा चेंडू राज्य...नागपूर ः भारतीय कापूस महामंडळाने खुल्या बाजारातून...
जळगाव जिल्हा बँकेत  मविआ विरूद्ध भाजप...जळगाव : काँग्रेसने भाजपसोबत सर्वपक्षीय पॅनलमध्ये...
हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावलाअकोला ः मागील ४८ तासांत वऱ्हाडातील अकोला, वाशीम,...
हेकेखोर विमा कंपन्यांनी वेठीस धरलेपुणे ः शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी...
ओल्या दुष्काळाची घोषणा करा अकोला : विदर्भ, मराठवाड्यात मागील दोन दिवसांत...
पुण्यातील धरणांतून विसर्ग बंदपुणे : परतीचा पाऊस राज्यातून परतल्याने पावसाने...
राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
नगर जिल्ह्यात निम्म्या सोयाबीनची नासाडीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात...
मॉन्सूनोत्तर पावसाने पुन्हा दाणादाणनाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या झळा शेतकरी सोसत...
अन्यथा स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार :...नागपूर : केंद्र आणि राज्य सरकारने आपसात काय गोंधळ...
सरकार साखर उद्योगासह ऊस उत्पादकांच्या...सोलापूर ः ‘‘साखर उद्योग शेतकऱ्यांचा आहे....
सोलापूर जिल्ह्यात ऊसबिलाची थकबाकी मिळेनासोलापूर ः जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामाला सुरवात...
आदिवासी वस्तीच्या पुनर्वसनासाठी लवकर...नाशिक : ‘‘शेतकरी असो वा शेतमजूर यांची प्रगती कशी...