Agriculture news in Marathi Inclusion of Wardha in banana, orange cluster | Page 2 ||| Agrowon

केळी, संत्रा क्लस्टरमध्ये वर्ध्याचा समावेश

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 सप्टेंबर 2021

एकूण २७ क्लस्टरमधील केळी व संत्रा क्लस्टरमध्ये वर्धा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून, आता वर्धा जिल्ह्यातील उत्तम दर्जेदार केळी निर्यात होण्यास चालना मिळणार आहे.

वर्धा : केंद्राच्या धर्तीवर राज्याने निर्यात धोरण तयार केले आहे. त्याअंतर्गत संबंधित शेतीमालाचे सर्वांत जास्त उत्पादन असलेल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली क्लस्टरनिहाय ‘क्लस्टर फॅसिलिटेशन सेल’ स्थापन करण्यात आले आहे. एकूण २७ क्लस्टरमधील केळी व संत्रा क्लस्टरमध्ये वर्धा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून, आता वर्धा जिल्ह्यातील उत्तम दर्जेदार केळी निर्यात होण्यास चालना मिळणार आहे.

वर्धा जिल्हा केळी उत्पादनात अग्रेसर ठरावा म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केळीच्या शेतीचे कृषी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व विक्री व्यवस्थेसाठी जिल्हा प्रशासनाकडून साह्य करण्यात येणार आहे. जिल्ह्यातून केळी निर्यातीला प्रोत्साहन देण्यासोबतच केळी लागवडीकडे शेतकऱ्यांना वळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार 
आहे. 

जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे केळी क्लस्टर सुविधा सेलचे अध्यक्ष राहणार असून, संबंधित शेती उत्पादन घेणारे जिल्हे क्लस्टरमध्ये समाविष्ट राहतील. तसेच संत्रा क्लस्टरसाठी अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असणार आहेत. जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी सेलू तालुक्यात केळी फळपिकाचे भरघोस उत्पादन घेण्यात येत होते. तालुक्यातील केळी ही उत्तम दर्जाची असल्यामुळे या ठिकाणाहून राज्यात सर्वत्र केळी विक्रीसाठी पाठविली जात होती. एवढेच नव्हे तर येथून केळी लागवडीसाठी कंदसुद्धा इतर जिल्ह्यांत पाठविण्यात येत होते. 

सद्यःस्थितीत जिल्ह्यात केळी लागवडीचे क्षेत्रफळ २४३ हेक्टर असून, सेलू तालुक्यासह इतर तालुक्यांतही केळी उत्पादनवाढीसाठी क्लस्टरनुसार महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात येणार आहे. क्लस्टरनिहाय क्लस्टर फॅसिलिटेशन सेलमध्ये  जिल्हाधिकारी अध्यक्ष, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक, जिल्हा उपनिबंधक, राष्ट्रीय संशोधन केंद्र, संबंधित कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी, कृषी विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी तसेच संबंधित पिकाचे उत्पादन घेणारे प्रगतशील शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कंपनी आदी सदस्य राहणार आहेत.

जिल्ह्यात २० वर्षांपूर्वी सेलू तालुक्यात केळी पिकाचे भरपूर उत्पादन होत होते. परंतु कालांतराने केळीच्या पिकाकडे कल कमी झाल्याने केळी उत्पादनात जिल्हा माघारला. केळीच्या लागवडीसाठी जिल्ह्यात पोषक वातावरण व जमीन आहे तसेच येथील केळी दर्जेदार असल्यामुळे निर्यातक्षम आहेत. जिल्ह्यात केळीसाठी नवीन केळीचे ‘क्लस्टर फॅसिलिटेशन सेल’ उभारणी होत असल्याने जिल्हा पुन्हा केळी उत्पादनात अग्रेसर ठरेल.
- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा


इतर बातम्या
नांदेड जिल्ह्यात रब्बीची पेरणी सुरुनांदेड : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून थंडी...
तापमानातील तफावत वाढलीपुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच...
शेतकऱ्यांना तत्काळ कर्जासाठी कृषी कर्ज...नगर : राज्यातील शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरीत्या...
तलाठ्यांच्या संपामुळे कामे खोळंबली नगर : तलाठ्यांच्या कामकाजासंदर्भात समन्वय...
तेलबिया आणा अन् खाद्यतेल घेऊन जापुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिवाजीनगर...
पूर्व विदर्भात करडईची होणार चार हजार...नागपूर ः देशाची खाद्यतेलाची गरज भागविण्याकरिता...
सोयाबीनच्या आवकेसह मागणीही वाढणारपुणे : देशभरातील बाजारात चालू सप्ताहात दैनंदिन...
परभणी कृषी विद्यापीठाकडून कुशल...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यंदा...
पुणे : रब्बीसाठी ३३,५०० क्विंटल...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
परभणी : सव्वा लाखावर पंचनामे प्रलंबित परभणी : जिल्ह्यातील पंतप्रधान पीकविमा...
हिंगोलीत सोयाबीनचे दर  ४६५० ते ४८५०...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
 कांदा दरात पुन्हा झाली घसरण नगर : दर मिळेल या आशेने गत वर्षीचा उन्हाळी,...
नागपुरात १९ हजार हेक्टरवरील पिके नष्ट नागपूर : ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यादरम्यान झालेली...
कांद्याचे भाव वाढल्यावरच  का पाडले...येवला, जि. नाशिक : उन्हाळ कांद्याचे भाव वाढून...
पीक नुकसानी भरपाई मिळणार वाढीव दराने  येवला, जि. पुणे : निसर्गाच्या आपत्तीत अतिवृष्टी व...
राष्ट्रीय स्तरावरील साखर उद्योगातील...कोल्हापूर : नवी दिल्लीच्या राष्ट्रीय सहकारी साखर...
दहा वर्षांवरील हरभरा वाणांना अनुदान नाहीपुणे ः राज्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना हरभरा...
यंदा कापूस तेजीतच राहणारपुणे : महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात...
पावसाने वाढली सोयाबीनची आवक नागपूर ः मध्य प्रदेशात पावसाच्या शक्‍यतेमुळे...
ड्रायपोर्टमुळे संत्रा निर्यातीला चालनानागपूर : वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे...