बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मोठे ‘इनकमिंग’

बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मोठे ‘इनकमिंग’
बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मोठे ‘इनकमिंग’

बुलडाणा : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी जिल्ह्यात सातत्याने आंदोलने करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत संग्रामपूर, शेगाव, मेहकर, बुलडाणा तालुक्यातील अनेकांनी प्रवेश घेतला. संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला.   या वेळी तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकरीहितासाठी सत्तेला लाथ मारणारी संघटना आहे. शेतकरीहीत हाच संघटनेचा आणि आपला वैयक्तिकदेखील अजेंडा आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर उतरून लढा देण्याची आपली तयारी आहे. शेतकऱ्यांना त्यांचा हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरीपुत्रांनी सज्ज व्हावे, येणाऱ्या काळात आपल्या लढ्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन  तुपकर यांनी केले.   प्रवेश घेणाऱ्यांमध्ये संग्रामपूर व शेगाव तालुक्यातील प्रतीक गावंडे, मोहन धर्माळ, गजानन रावणकर, गजानन ढोले, चंदन कोहरे, विजय मानकर, प्रशांत लहुकार, विकी तराळे, आकाश जाधव, संदीप घिवे, सुरेश खिरोडकार, प्रमोद चोपडे, घनश्याम राठी, शिवलाल चोपडे, शत्रुघ्न चोपडे, दिलीप चोपडे, प्रवीण उमाळे, प्रमोद चोपडे, गजानन चोपडे, संजय चोपडे, प्रमोद वडशंकर, राजेश निमकर्डे, सागर निमकर्डे, सुपडा सोनोने, रामभाऊ करांगळे, नयन इंगळे, नीलेश पाटील यांच्यासह इतर बहुसंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com