नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक सर्वसाधारण; दर स्थिर

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक बाजार समितीचे कामकाज १२ ते २३ दरम्यान बंद होते. त्यानंतर गत सप्ताहात सोमवार (ता.२४) पासून कामकाज सुरू झाले.
Incoming of green chillies is normal in Nashik; Rate stable
Incoming of green chillies is normal in Nashik; Rate stable

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक बाजार समितीचे कामकाज १२ ते २३ दरम्यान बंद होते. त्यानंतर गत सप्ताहात सोमवार (ता.२४) पासून कामकाज सुरू झाले. हिरव्या मिरचीची आवक १०७३ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल २२०० ते ३५०० रुपये, तर सरासरी दर ३००० रुपये मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

चालू सप्ताहामध्ये उन्हाळ कांद्याची आवक १८९९८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ९०० ते २००० मिळाला, तर सरासरी दर १५५० रुपये राहिला. बटाट्याची आवक ४२२६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६५० ते १४००, तर सरासरी दर १०५० रुपये राहिला. लसणाची आवक २०२  क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६५०० ते १२५०० तर सरासरी दर ८५०० रुपये राहिला. आल्याची आवक १३२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १४०० ते २२००, तर सरासरी दर १७०० रुपये राहिला. 

वालपापडी-घेवड्याची आवक १२३१ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ६००० ते ८२००, तर सरासरी दर ७००० रुपये, घेवड्याला प्रतिक्विंटल ३५०० ते ६५००, तर सरासरी दर ४७०० रुपये राहिला. गाजराची आवक ३८८२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ८०० ते १५५० तर सरासरी दर १२०० रुपये राहिला.

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ५० ते २२५, तर सरासरी १४०, वांगी २५० ते ४२५ तर सरासरी ३२० व फ्लॉवर ५० ते १५० सरासरी १२० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. कोबीला १७० ते ३२५, तर सरासरी २२० रुपये दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला १८० ते २५०, तर सरासरी दर २२० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले.

वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा १०० ते २९०, तर सरासरी १५५, कारले २५० ते ४५०, तर सरासरी ३२५, गिलके ५०० ते १००० तर सरासरी ७००, दोडका ५०० ते १०००, तर सरासरी दर ७०० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. काकडीला २५० ते ४५०, तर सरासरी ३५५ रुपये असे २० किलोस दर मिळाले.

केळीची आवक ११६० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १००० ते १५००, तर सरासरी दर १२५० रुपये मिळाला. डाळिंबांची आवक १५२१ क्विंटल झाली. त्यांना १०००० ते १८०००, तर सरासरी १४००० रुपये दर मिळाला. आंब्यांची आवक १७४५ क्विंटल झाली. केशरला २५०० ते ४५०० तर सरासरी ३५०० रुपये दर मिळाला. लालबागला २५०० ते ४५०० तर सरासरी ३५०० रुपये  दर मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com