जायकवाडी धरणातील आवक, विसर्ग घटला

जायकवाडी धरणातील आवक, विसर्ग घटला
जायकवाडी धरणातील आवक, विसर्ग घटला

जायकवाडी, जि. औरंगाबाद : जायकवाडी प्रकल्पात नांदूर मध्यमेश्‍वर प्रकल्पातून होणाऱ्या विसर्गामुळे येणाऱ्या पाण्याची आवक शुक्रवारच्या (ता. २७) तुलनेत घटली आहे. शनिवारी (ता. २८) दुपारी दोन वाजताच्या सुमारास जायकवाडीत २८३४१ क्‍युसेकने सुरू असलेल्या आवकेच्या तुलनेत ३१४८५ क्‍युसेकने विसर्ग सुरू होता. शुक्रवारी आवकही ५० हजार क्‍युसेकने, तर विसर्गही त्याच प्रमाणात सुरू होता.  

नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नांदूर मध्यमेश्‍वरमधून जायकवाडीच्या दिशेन पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. बुधवारी (ता. २५) सुरू झालेल्या या विसर्गामुळे येणारे पाणी साठविण्यासाठी आधीच तुडुंब असलेल्या जायकवाडीत जागा करणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे संबंधित यंत्रणेने व प्रशासनाच्या समन्वयातून जायकवाडीमधून गोदावरीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्याची सुरवात केली गेली. 

बुधवारी दहा दरवाजे व नंतर गुरुवारी (ता. २६) १६ दरवाजे दोन फुटांनी उघडून जवळपास ३५ हजार क्‍युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. शुक्रवारी (ता. २७) दुपारी बारा वाजेपर्यंत विसर्ग ५०३०४ क्‍युसेकपर्यंत वाढविण्यात आला होता. शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास मात्र प्रकल्पात येणारी आवक घटल्याने विसर्गही घटविण्यात आला. 

आधी दोन फुटांनी उडलेले धरणाचे सोळा दरवाजे अर्धा फुटाने खाली घेण्यात आले. दीड फुटाने उघडलेल्या या दरवाज्यातून २५१५२ क्‍युसकने पाण्याचा विसर्ग गोदावरीच्या पात्रात सुरू होता. शिवाय वीज केंद्रातून १५८९ क्‍युसेक, उजव्या कालव्यातून ९०० क्‍युसेकने, तर डाव्या कालव्यातून ७०० क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती सहायक अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी दिली. 

प्रकल्प तुडुंब असल्याने येणाऱ्या पाण्याची आवक त्याच प्रमाणात प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करून तुडुंब असलेली जायकवाडीची पातळी कायम राखणे सुरू असल्याचे प्रकल्पाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com