agriculture news in marathi The incoming of red onions stalled | Agrowon

खानदेशात लाल कांद्याची आवक रखडली

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याचे लिलाव सुरू आहेत. आवक कमी असली, तरी दरांवर दबाव वाढत आहे. 

जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याचे लिलाव सुरू आहेत. आवक कमी असली, तरी दरांवर दबाव वाढत आहे. 

कोरोनाची वाढती समस्या, लॉकडाऊनची तयारी, बंद झालेले मोठे हॉटेल्स व इतर कारणांमुळे कांद्याचा उठाव कमी झाल्याची बतावणी बाजारात सुरू झाली आहे. गेल्या महिन्यात कांद्याची जळगाव बाजार समितीत प्रतिदिन सरासरी ४५० क्विंटल आवक झाली होती. परंतु, दर टिकून होते. त्या वेळेस व्यापारी ते व्यापारी, असे व्यवहार होत होते.

शेतकऱ्यांकडून कांद्याची आवक होत नव्हती. यामुळे दर पाडले नाहीत, असा दावा आता शेतकरी करीत आहेत. कांद्याचा काढणी हंगाम खानदेशात लांबला आहे. परंतु, या आठवड्यात अनेक भागात नव्या कांद्याची काढणी सुरू होईल. 

गेल्या पंधरवड्यात चाळीसगाव, धुळे, जळगाव येथील बाजारात मिळून रोज दोन ते अडीच हजार क्विंटल लाल कांद्यांची आवक होत होती. सध्या खानदेशात सर्वत्र मिळून प्रतिदिन दीड हजार क्विंटलवर आली आहे. कमी दर्जाच्या कांद्याला १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत. तर, दर्जेदार कांद्याला कमाल पाच ते साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत. दर्जेदार कांद्याच्या दरात क्विंटलमागे २०० ते २५० रुपयांची घसरण सध्या दिसत आहे.

शेतकऱ्यांकडून आवक रखडत सुरू आहे. 
जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, जळगाव, धुळ्यातील धुळे येथे लिलाव रोज होत आहेत. चाळीसगाव येथे लिलावांना मध्यंतरी प्रतिसाद मिळाला. सुमारे ६०० क्विंटल कांद्याची आवक रोज तेथे झाली. या आठवड्यात प्रतिदिन ४०० क्विंटल आवक झाली.

शेतकरी चिंतेत

लाल कांद्याची अधिकची आवक आहे. नवीन कांद्याची काढणी सर्वत्र सुरू झालेली नाही. ती झाल्यानंतर दर आणखी कमी होतील, असे चित्र आहे. कारण आतापासून दर पाडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकरी काढणी सुरू होण्यापूर्वीच चिंतेत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
नव्या कृषी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना...नाशिक : श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने सुरू...
येवल्यात ४६ हजार ग्राहकांकडे २६६ कोटी...येवला, जि. नाशिक : तालुक्यातील कृषिपंप धारकांची...
हवामान बदलाचा आंब्यावरील परिणाम...रत्नागिरी ः वातावरणातील चढ-उताराचे आंबा पिकावर...
परभणीत तूर विक्रीसाठी ६ हजार...परभणी ः आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तूर विक्रीसाठी...
आम्हाला सोडून गेले, ते पराभूत झाले :...नगर : राज्य विधानसभेत मी १९८० साली ५६ आमदारांचा...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या...नागपूर ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून...
पी. आर. पाटील साखर संघाचे पुढील अध्यक्ष... कुरळप, जि. सांगली :  सहकार क्षेत्रातील...
निळेली पशुधन संशोधन केंद्रास वंश...सिंधुदुर्गनगरी ः कोकण कन्याळ या शेळी जातीच्या...
सिंधुदुर्गमध्ये बांधले साडेपाच हजार...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात भासणाऱ्या संभाव्य...
अमरावतीत शेतकऱ्यांवर ४३ कोटींच्या...अमरावती : हंगामात बॅंकांकडून पीककर्जाच्या बाबतीत...
भंडाऱ्यात ८९५ शेतकऱ्यांचे सूक्ष्म...भंडारा : सूक्ष्म सिंचनाला जिल्ह्यात शेतकऱ्यांचा...
छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान खरेदीरायपूर : : छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान...
‘किसान गणतंत्र परेड’ शांततेतच होणार नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचा एक...
नक्षत्रांचे गणित चुकू लागलेगावातील वयोवृद्ध माणसे हाताच्या बोटांवर गणिते करत...
पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
हवामान बदलाला अनुरूप पीक पद्धतीची गरजजागतिक पातळीवर विविध मार्गांनी हवेमधील कार्बन...
कृषी कायद्यांविरोधात शेतकरी विधवांचा...यवतमाळ : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांमुळे...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख ७० हजार...नांदेड : जिल्ह्यात रब्बीमध्ये दोन लाख सत्तर हजार...
पावणेतीन हजार कोटींची कामे मंजूर ः...नांदेड : ‘‘कारोना संसर्गाच्या काळात विकास...
खानदेशातील प्रकल्पांत ५८ टक्के पाणीजळगाव ः खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये...