सांगलीत हळदीच्या आवकेत ७ हजार ५५० क्विंटलने वाढ

सांगली : येथील बाजार समितीच्या आवारात हळदीची गतसप्ताहापेक्षा चालु सप्ताहात आवक ७ हजार ५५० क्विंटलने आवक वाढली आहे.
In the incoming of Sangli turmeric Increase by 7 thousand 550 quintals
In the incoming of Sangli turmeric Increase by 7 thousand 550 quintals

सांगली : येथील बाजार समितीच्या आवारात हळदीची गतसप्ताहापेक्षा चालु सप्ताहात आवक ७ हजार ५५० क्विंटलने आवक वाढली आहे. चालु सप्ताहात हळदीची ३२ हजार ८३० क्विंट आवक झाली. त्यास प्रति क्विंटल ८ हजार ५७५ रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बाजार समितीत महिन्यापूर्वी हळदीचे ऑनलाइन सौदे सुरु झाले. हळद विक्रीसाठी शेतकरी पुढे येवू लागले असल्याने बाजार समितीत हळदीची आवक वाढू लागली आहे. गतसप्ताहात हळदीची २८ हजार २८० क्विंटल आवक झाली होती. त्यास प्रति क्विंटल ७ हजार ५२२ रुपये असा दर मिळाला. हळदीच्या आवकेत वाढ होऊ लागली असून दरात देखील वाढ होत असल्याचे बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  हळदीची आवक, दर 

तारीख आवक दर 
१ ते ७ मे १८ हजार ८३५ ७५७१ 
८ ते १४ मे २९ हजार १८४ ७४७१ 
१५ ते २१ मे २५ हजार २८०. ७५२२
२२ ते २८ मे ३२ हजार ८३० ८५७१ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com