Agriculture news in Marathi, Incoming shortage of tomatoes, green chilli; Price increases | Agrowon

टोमॅटो, हिरवी मिरचीची आवक कमी; दरात वाढ
टीम अॅग्रोवन
सोमवार, 10 जून 2019

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ९) भाजीपाल्याची अवघी सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. टोमॅटो, काकडी, हिरवी मिरची, तोतापुरी कैरीची आवक मंदावल्याने आणि मागणी वाढल्याने यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती. तर पालेभाज्यांचे वाढलेले दर स्थिर होते.  

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ९) भाजीपाल्याची अवघी सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. टोमॅटो, काकडी, हिरवी मिरची, तोतापुरी कैरीची आवक मंदावल्याने आणि मागणी वाढल्याने यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती. तर पालेभाज्यांचे वाढलेले दर स्थिर होते.  

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथून सुमारे १० टेंपो हिरवी मिरची, हिमाचल प्रदेशातून सुमारे २ ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून ३ ट्रक कोबी, कर्नाटकमधून तोतापुरी कैरी सुमारे ४ टेंपो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ३ टेंपो, कर्नाटकमधून श्रावणी घेवडा सुमारे २ टेंपो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी तर इंदूर येथून गाजर सुमारे ३ टेंपो आवक झाली होती.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ५०० गोणी, टॉमेटो अवघे सुमारे अडीच हजार क्रेट, फ्लॉवर सुमारे १० टेंपो, तर कोबी आणि ढोबळी मिरची प्रत्येकी सुमारे १० टेंपो, तांबडा भोपळा १० टेंपो, गावरान कैरी सुमारे ८ टेंपो, उन्हाळी भुईमूग सुमारे २०० गोणी, शेवगा २ टेंपो, घेवडा ३ टेंपो, तसेच कांदा सुमारे ८० ट्रक, तर स्थानिकसह आग्रा, इंदूर येथून बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 
कांदा - १२० - १५०, बटाटा- १०० - १६०, लसूण - ४०० - ७००, आले : सातारी ६०० - ७५०, भेंडी : २०० - २५०, गवार : २०० - ३००, टोमॅटो - २५० - ३२०, दोडका : ३०० - ३५०, हिरवी मिरची : ५५० - ६५०, दुधी भोपळा : ५० - १००, चवळी : १५० - १६०, काकडी : १५० - १६०, कारली : हिरवी ३०० - ३५०, पांढरी २०० - २५०, पापडी : २५० - ३००, पडवळ : २५० - ३००, फ्लॉवर : ८० - १००, कोबी : १०० - १३०, वांगी : १०० - २००, डिंगरी : १५० - १६०, नवलकोल : १४० - १५०, ढोबळी मिरची : २५० - ३००, तोंडली : कळी ३०० - ३५०, जाड : १५० - १६०, शेवगा : ३०० - ३५०, गाजर : १५० - १६० वालवर : २८० - ३००, बीट : १०० - १२०, घेवडा : ७०० - ८००, कोहळा : १०० - १५०, आर्वी : ३०० - ३५०, घोसावळे : १५० - २००, ढेमसे : १५० - २००, भुईमूग : ३०० - ३५०, पावटा : ६०० - ६५०, मटार : ७०० - ८००, तांबडा भोपळा ६० - १२०, चिंच अखंड ३५०, सुरण : ३०० - ३२०, मका कणीस : ६० - १००, नारळ (शेकडा) : १००० - १६००.

पालेभाज्या
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख तर मेथीची सुमारे अवघी सुमारे ४० हजार जुड्या आवक झाली होती.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : १००० - १८००, मेथी : १००० - १५००, शेपू : ५०० - १०००, कांदापात : १२०० - १५००, चाकवत : ८०० - १०००, करडई : ५०० - ६००, पुदिना : ३०० - ५००, अंबाडी : ७०० - ८००, मुळे : १००० - १५००, राजगिरा : ५०० - ६००, चुका : ८०० - १०००, चवळई : ४०० - ६००, पालक : ५०० - ७००.

फळबाजार
रविवारी (ता. ९) मोसंबी सुमारे ३० टन, संत्री २ टन, डाळिंब २०० टन, पपई १० टेंपो, लिंबे सुमारे ३ हजार गोणी, चिकू ५०० डाग, कलिंगड ३० टेंपो, खरबूज २० टेंपो आवक झाली होती. सध्या पुणे जिल्ह्यातील गावरान आंब्याचा हंगाम सुरू झाला असून, मावळ मुळशी, भोर वेल्हा, खडकवासला परिसरातून सुमारे २२ हारे (मोठ्या पाट्या) आवक झाली होती. तर कर्नाटकातून विविध जातींच्या आंब्याची सुमारे ८ हजार पेटी, करंडीची आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : २००-७००, मोसंबी : (३ डझन) : १८०-३२०, (४ डझन) : ८०-१६०, संत्रा : (३ डझन) : ३१०-४४०, (डझन ४) : १२०-२६०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : १५-७०, गणेश ५-२०, आरक्ता १०-३५. कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-२०, पपई : ५-२०, चिकू : १००-६००, कोकण हापूस (४-८ डझन) तयार - १२००-२०००. कर्नाटक - हापूस ५-५ डझन) - ८००-१२००, प्रतिकिलो ४०-७०, पायरी (४ डझन) ६००-८००, लालबाग २०-३० प्रतिकिलो, बैंगणपल्ली आणि बदाम ३०-४० किलो, तोतापुरी २०-३० किलो, मल्लिका - ३०-५०. 

फुलबाजार
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ३०-६०, गुलछडी : ३०-६०, कापरी : ३०-६०, मोगरा : १५०-३००, आॅस्टर : ३०-६०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-४०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ६०-१००, लिली बंडल : ३-४, जरबेरा : १०-४०, कार्नेशियन : ६०-१५०.

मटण मासळी
गणेश पेठ येथील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. ९) खोल समुद्रातील मासळी सुमारे ६ टन, खाडीची २०० किलो तर नदीची सुमारे १ टन आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे ८ टन आवक असल्याची माहिती ठाकूर परदेशी यांनी दिली. दरम्यान पश्‍चिम किनारपट्टीची आवक बंद असून, पूर्व किनारपट्टीची आवक अद्याप सुरू न झाल्याने बाजारात सध्या शीतगृहातील मासळीची आवक सुरू आहे. त्यामुळे दर वाढलेले असल्याचेही परदेशी यांनी सांगितले.

खोल समुद्रातील मासळी 
(प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १६००, मोठे १६००, मध्यम: १२००-१३००, लहान ९००-१०००, भिला : ७००-७५०, हलवा : ८००, सुरमई : ७००- ८००, रावस : लहान ६५०-७००, मोठा : ९००, घोळ : ७००, करली : ४००, करंदी (सोललेली) : ४००, भिंग : ४४०, पाला : ७०० -११०० वाम : पिवळी लहान ५५०-८००, मोठे - काळी : ४००-४८०, ओले बोंबील : २००-२४०,कोळंबी ः लहान ३२०, मोठी : ५५० जंबो प्रॉन्स : १६००, किंग प्रॉन्स : १०००, लॉबस्टर : १५००, मोरी : ४००, मांदेली : १४०-१५०, राणीमासा : २४०, खेकडे : २८०, चिंबोऱ्या : ५५०

खाडीची मासळी 
सौंदाळे : ३२०, खापी ३२०, नगली : लहान : २४० मोठी ६००-६५०, तांबोशी : ४८०, पालू : ३२०, लेपा : २४०, शेवटे : ३२० बांगडा : लहान १६०-१८० , मोठा २००-२८०, पेडवी : १२०, बेळुंजी : १६०, तिसऱ्या : २४०, खुबे १४०, तारली : १६०

नदीची मासळी 
रहू : १६०, कतला : १६०, मरळ : ३६०, शिवडा : २००, खवली : २००, आम्ळी : १०० खेकडे : २८०, वाम : ५५०.

मटण 
बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५६०.

चिकन 
चिकन : १७०, लेगपीस : २००, जिवंत कोंबडी : १४०, बोनलेस : २७०.

अंडी 
गावरान : शेकडा : ६४०, डझन : ९० प्रतिनग : ७.५ इंग्लिश : शेकडा : ४०० डझन : ६० प्रतिनग : ५

इतर बाजारभाव बातम्या
खानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
औरंगाबादेत कोबी १००० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये कांद्याची आवक घटली; दरात वाढनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
परभणीत काकडी प्रतिक्विंटल ३०० ते ६००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिकमध्ये गवार २५०० ते ४५०० रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात डाळिंब २१०० ते ४८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
केळीच्या मध्य प्रदेशातील आवकेत घट;...जळगाव : मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातील...
सोलापुरात वांगी, गवार, भेंडीच्या दरांत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये लिंबू २५०० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात नवीन गुळाला साडेतीन ते सहा...कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शाहू...
राज्यात घेवडा प्रतिक्विंटल ८०० ते ५५००...सोलापुरात प्रतिक्विंटलला सर्वाधिक ४५०० रुपये...
नाशिकमध्ये वांगी १३०० ते ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात वांगी, घेवडा, गवारीच्या दरात...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
उत्तम दर्जाच्या मुगाला ६२५० पर्यंत दरजळगाव  ः खानदेशातील धुळे, जळगाव, साक्री,...
कळमणा बाजारात कांद्याच्या दरात सुधारणानागपूर ः मागणी वाढल्याने कळमणा बाजार समितीत कांदा...
गुलटेकडीत कांदा, लसूण, कोबीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये शेवगा ३००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात ढोबळी मिरचीला १००० ते ३००० रूपयेपुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...