आवक सुरळीत; पालेभाज्यांच्या दरात वाढ 

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.५) भाजीपाल्याची सुमारे ८० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्यात पावसामुळे कमी झालेली आवक, रविवारी सुरळीत झाली.
Incoming smooth; Increase in prices of leafy vegetables
Incoming smooth; Increase in prices of leafy vegetables

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.५) भाजीपाल्याची सुमारे ८० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्यात पावसामुळे कमी झालेली आवक, रविवारी सुरळीत झाली. तर आवक घटल्याने भेंडी, गवार, टोमॅटो, कोबी, वांगी यांच्यासह पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली होती.  भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, मध्य प्रदेश २० ट्रक मटार, आंध्र प्रदेश येथून अवघा २० गोणी शेवगा, राजस्थान येथून १० टेम्पो गाजर, तर गुजरात, मध्य प्रदेशातून लसणाची सुमारे १० ट्रक आवक झाली होती.  स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार गोणी, टोमॅटो ७ हजार क्रेट, कोबी ५ टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी ५ टेम्पो, फ्लॉवर सुमारे १५ टेम्पो, सिमला मिरची १० टेम्पो, भुईमुग शेंगा सुमारे ५० गोणी, तांबडा भोपळा १० टेम्पो, कांदा सुमारे ७० ट्रक, आग्रा, इंदौर, येथून बटाटा सुमारे १० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे १० किलोचे भाव  कांदा : १००-२५०, बटाटा ८०-१५०, लसूण : २००-४००, आले : सातारी १००-२००, भेंडी : ४००-६००, गवार : ४००-६००, टोमॅटो : ३००-५००, दोडका : २५०-३५०, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा: १००-१५०, चवळी: २००- २५०, काकडी : २००-२५०, कारली हिरवी २००-२५०, पांढरी २००-२२०, पापडी : ३००-३५०, पडवळ: १६०-२००, फ्लॉवर: ८०-१२०, कोबी : २५०-३५०, वांगी : ३००-५००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल: १४०-१५०, ढोबळी मिरची: ४००-६००, तोंडली: कळी ४००-४५०, जाड, २००-२५०, शेवगा: १४०० -१५००, गाजर २००-२८०, वालवर ३००-३५०, बीट: १५०-२००, घेवडा : ३५०-४००, कोहळा : १००-१५०, आर्वी: ३००-३५०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे: २००-२५०, भुईमूग शेग : ३५०-४५०, मटार: परराज्य -४००-४५० पावटा: २००-३००, तांबडा भोपळा: ६०-१००, सुरण: १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ: शेकडा १०००-१६००.  पालेभाज्यांचे शेकड्याचे दर  पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची १ लाख २५ हजार, तर मेथीची २० हजार जुड्या आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : २००-८००, मेथी : १०००-१५००, शेपू : १०००-१५००, कांदापात : १०००-२०००, चाकवत: १०००-१२००, करडई: ८००-१०००, पुदीना २००-५००, अंबाडी ८००-१२००, मुळे: १५००-२०००, राजगिरा: ४००-६००, चुका : ५००-८००, चवळई: ५००-६००, पालक: १०००-१६००, हरभरा गड्डी - ८००-१२००  फळबाजारात रविवारी (ता.५) लिंबाची सुमारे तीन हजार गोणी, डाळिंबाची सुमारे १५ टन, मोसंबी ५० टन, संत्रा १० टन, पपई २५ टेम्पो, चिकू एक हजार गोणी, पेरूची सुमारे ७०० क्रेट, सीताफळ ८ टन, कलिंगड ३ तर खरबूज ५ टेम्पो, विविध बोरांची सुमारे १ हजार गोणी आणि द्राक्षाची दोन टन आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे लिंबे (प्रति गोणी) : २५०-४००, मोसंबी : (३ डझन) : १४०-३००, (४ डझन) : ७० -१२०, संत्रा : (१० किलो) : १००-५००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ५०-२५०, गणेश : २०-६०, आरक्ता ३०-८०, कलिंगड : १०-३०, खरबूज : १०-२० पपई : ५-१५, चिक्कू (१० किलो) १००-४००, पेरू (२० किलो): ३००-४००, सीताफळ १०-६०. बोरे (प्रति १० किलोचे दर) - चण्यामण्या ४५०-५००, चेकनट ४५०-५००, उमराण ३०-६०, चमेली १२०-१८० 

फुलबाजार  गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसाचा फटका सर्व प्रकारच्या फुलांना बसल्याने घाऊक फुलबाजारातील आवक घटली होती. आवकेमध्ये दर्जेदार फुलांचे प्रमाण अत्यल्प असल्याने चांगल्या फुलांच्या दरात वाढ झाली होती.  फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ३०-१००, गुलछडी : ४०-७०, अ‍ॅष्टर : जुडी २०-३०, सुट्टा ६०-१५०, कापरी : ३०-८०, शेवंती : ३०-१००, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-५०, गुलछडी काडी : ४०-८०, डच गुलाब (२० नग) : १५०-२५०, जर्बेरा : ६०-७०, कार्नेशियन : १५०-३००, शेवंती काडी २००-२५०, लिलियम (१० काड्या) ८००-१०००, ऑर्चिड ३००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१२०.  मटण मासळी  गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता.५) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १५ टन, खाडीतील मासळीची सुमारे ३०० किलो, नदीतील मासळी सुमारे ७०० किलो तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलनची सुमारे २० टन आवक झाली होती. पापलेटच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली होती. तर हलवा, कोळंबी या मासळीच्य दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली होती. बांगड्याचे दर स्थिर असल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले. 

खोल समुद्रातील मासळी (प्रति किलोचे दर) : पापलेट : कापरी : १३००-१४०० मोठे-१२००-१४०० मध्यम : ९००-१०००, लहान ७००-७५०, भिला : ५५०-६००, हलवा : ४८०-५५०, सुरमई : ३६०-४८०, रावस : लहान ४८०-५५०, मोठा : ७००-७५०, घोळ : ५५०-६००, करली : १६०-२००, पाला : ७५०-१२००, वाम : १६०-६५० करंदी-४००-४८०, ओले बोंबील : १६०-२००, भिंग-३००-४८०  कोळंबी : लहान १६०-२४०, मोठी-४००-५५०, जंबो प्रॉन्स : १४०० किंग प्रॉन्स : ८००- ९००, लॉबस्टर : १५००-१६००, मोरी : २००-३२०, खेकडे : आवक नाही. चिंबोऱ्या : ४८०-५५०, मांदेली-१००-१६०, राणीमासा-१६०-२००  खाडीची मासळी : सौंदाळे-१६०-२४०, खापी-२४०, नगली : १६०-२८०, तांबोशी : ३२०-४००, पालू- २००, बांगडा : लहान-१६०, बांगडा मोठा- २००-२८० शेवटे १६०- २००, तिसऱ्या: आवक नाही, खुबे : १२०-१४०, लेपा-१६०-२००, पेडवी-१००, वेळुंजी-आवक नाही, तारली-२००  नदीतील मासळी  रहू-१६०, कतला-१६०, मरळ-४००, शिवडा-२००-२४०, खवली-२००-२४०, आम्ळी-१००, खेकडे-२००, वाम-४८०-५००  मटण- बोकडाचे ६८०, बोलाईचे- ६८०, खिमा-६८०, कलेजी-७२०  चिकन - २००, लेगपीस-२५०, जिवंत कोंबडी-१५० , बोनलेस-३००  अंडी  गावरान शेकडा ९२०, डझन १२०, प्रति नगास १०  इंग्लिश शेकडा ५२५, डझन ७२, प्रति नगास ६   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com