नगर जिल्ह्यात ज्वारीची आवक वाढली, दरात घसरण

The incoming of sorghum increased in the Nagar district, rate down
The incoming of sorghum increased in the Nagar district, rate down

नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात गावरान ज्वारीची आवक वाढली, मात्र दरात काहीशी घसरण झाली आहे. ज्वारीची काढणी वेगात सुरू झाली आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरात गावरान ज्वारीची ५९८ क्विंटलची आवक होऊन ज्वारीला २२०० ते २७५० रुपयांचा दर मिळाला. भाजीपाल्यात शेवगा, गवार, लसणाचे दर टिकून आहेत. अन्य भाजीपाल्याच्या दरांत चढउतार होत आहे. 

नगर, सोलापूर, मराठवाड्यातील काही भागांतून येथे आवक होत असल्याने नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत गावरान ज्वारीची आवक वाढत असते. पंधरा दिवसांपासून आवकेत वाढ होत आहे. गेल्या आठ दिवसांत अजून जास्त आवक होत आहे. मात्र, दरांत काहीशी घसरण झाली आहे.

बाजरीची ४६ क्विंटलची आवक झाली आणि प्रती क्विंटलला १५३१ ते २५२५ रुपये दर होता. तुरीची ३६५ क्विंटलची आवक होऊन ४१०० ते ४६०० रुपयांचा दर मिळाला. हरभऱ्याची १७३ क्विंटलची आवक झाली. त्यास ३६०० रुपयांचा दर मिळाला. मुगाची ६८ क्विंटलची आवक होऊन पाच हजार ८०० ते ७ हजार १०० रुपयांचा दर मिळाला. सोयाबीनची ६४ क्विंटलची आवक होऊन २५०० ते ३६०० रुपयांचा दर मिळाला. गुळाची ४२० क्विंटलची आवक होऊन २९०० ते ४५०० रुपयांचा दर मिळाला. लाल मिरचीची आवकही टिकून आहे.

गेल्या आठवडाभरात तिची ४७७ क्विंटलची आवक झाली. ६३०० ते १३५८० रुपयांचा दर मिळाला. गव्हाची २१८ क्विंटलची आवक झाली. २०४० ते २०६५ रुपयांचा दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले. भाजीपाल्यात लसूण, गवार, शेवग्याचे दर टिकून आहेत.   

वांग्यांना ५०० ते १२०० रुपये दर

टोमॅटोला प्रतिक्विंटल तीनशे ते पाचशे, वांग्याला पाचशे ते बाराशे , फ्लॉवरला तीनशे ते एक हजार, कोबीला दोनशे ते तीनशे, घोसाळीला दीड हजार ते दोन हजार, कारल्याला एक हजार ते अडीच हजार, भेंडीला अडीच हजार ते तीन हजार रुपयांचा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com