Agriculture news in marathi Incoming of vegetables, fruit re-open of market committees in Beed, Osmanabad, Latur district | Agrowon

बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील बाजार समित्यांतील आवक पूर्वपदावर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 एप्रिल 2020

लातूर / उस्मानाबाद : बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील बाजार समित्यांतील शेतमाल आवक हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी (ता.२१) काही वगळता अनेक समित्यांमध्ये फळे-भाजीपाल्यासह शेतमालाची आवक सुरू झाली, अशी माहिती ‘पणन’ च्या सूत्रांनी दिली. 

लातूर / उस्मानाबाद : बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील बाजार समित्यांतील शेतमाल आवक हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी (ता.२१) काही वगळता अनेक समित्यांमध्ये फळे-भाजीपाल्यासह शेतमालाची आवक सुरू झाली, अशी माहिती ‘पणन’ च्या सूत्रांनी दिली. 

बीड जिल्ह्यात १०, लातूर जिल्ह्यात ११, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ९ मिळून जवळपास ३० बाजार समित्या या तीन जिल्ह्यांत कार्यरत आहेत. ‘लॉकडाउन’च्या कालावधीत तीनही जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील शेतमालाच्या आवकेवर थेट परिणाम झाला. शेतमालाची विक्री करायची कुठे, असा प्रश्न शेतकऱ्याना पडला. सोमवार (ता. २०) नंतर जवळपास सर्वच बाजार समित्यांमधील विस्कळीत झालेली शेतमाल खरेदीची प्रक्रिया पूर्वपदावर येईल, अशी आशा पणन विभागातर्फे गत आठवड्यात व्यक्त करण्यात आली. 

मंगळवारी (ता.२१) लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील ३० पैकी ८ बाजार समित्या वगळता २२ समित्यांमध्ये शेतमालाची कमी अधिक प्रमाणात आवक झाली, असे पणन विभागाने स्पष्ट केले.

लातूर जिल्ह्यातील ११ पैकी जळकोट बाजार समितीला सुट्टी असल्याने ती बंद राहिली. तर, निलंगा बाजार समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बंद होती. याशिवाय रेनापूर, शिरूर अनंतपाळ, चाकुर, देवणी या बाजार समित्यांमध्ये आवकच झाली नाही. तर, लातूर बाजार समितीमध्ये जवळपास दीड हजार क्विंटल शेतमालाची आवक झाल्याचे पणन विभागाने स्पष्ट केले. 
 
उस्मानाबादमधील ९ बाजार समित्यांत आवक 

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व ९ बाजार समित्यांमध्ये मंगळवारी शेतमालाची कमी-अधिक प्रमाणात झाली. दुसरीकडे बीड जिल्ह्यातील १० पैकी पाटोदा, वडवणी बाजार समिती वगळता उर्वरित सर्वच बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक झाली, अशी माहिती पणन विभागातर्फे देण्यात आली. 
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...