नगर बाजार समितीत भाजीपाला आवक स्थिर

नगरः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक स्थिर राहिली. काही भाज्यांच्या दरात सुधारणा झाली. भुसारमध्येही आवक आणि दर नेहमीप्रमाणे स्थिर राहिल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.
Incoming of vegetables is stable in Nagar Bazar Samiti
Incoming of vegetables is stable in Nagar Bazar Samiti

नगरः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक स्थिर राहिली. काही भाज्यांच्या दरात सुधारणा झाली. भुसारमध्येही आवक आणि दर नेहमीप्रमाणे स्थिर राहिल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. 

नगर येथील कृषी बाजार समितीत टोमॅटोला ११८ ते १२० क्विंटलची दर दिवसाला १८०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. वांग्यांची ३० ते ३५ क्विंटलची आवक होऊन १५०० ते ३५००, फ्लॉवरची ३२ ते ३५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार, कोबीची ५० ते ५५ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १२००, काकडीची ५८ ते ६२ क्विंटलची आवक होऊन ८०० ते १८००, गवारीला ७००० ते ८५००, घोसाळ्याची २ ते ५ क्विंटलची आवक होऊन १५०० ते ३ हजार, कारल्याची १२ ते १५ क्विंटलची आवक होऊन १८०० ते ३ हजार, भेंडीची ३५ ते ४० क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजार रुपये दर मिळाला.

वाल शेंगाची ५ ते १० क्विंटलची आवक होऊन २८०० ते ४ हजार २००, बटाट्याची २७८ ते ३०० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार, हिरव्या मिरचीची ८० ते १०० क्विंटलची आवक होऊन ३ हजार  ते ४ हजार ५००, शेवग्याची २ ते ४ क्विंटलची आवक होऊन ५ हजार ते १० हजार, शिमला मिरचीची ४४ ते ५० क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजाराचा दर मिळाला. 

पालेभाज्यात कोथिंबिरीच्या ६ हजार ७०० जुड्याची आवक होऊन शंभर जुड्यांना ८०० ते १२००, मेथीच्या ४ हजार  ते ४ हजार ५०० जुड्यांची आवक होऊन शंभर जुड्यांना १५०० ते २ हजार रुपये, शेपुच्या ३४५ ते ४०० जुड्यांची आवक होऊन ९०० ते १२००, पालकच्या २५० ते ३०० जुड्यांची आवक होऊन ८०० ते १ हजार रुपयाचा शंभर जुड्यांना दर मिळाला. 

भुसारची आवक कायम  

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गावरान ज्वारीची आवक अल्प आहे. ज्वारीला १६०० ते  १९५० रुपयांचा दर मिळत आहे. आवक कमी असूनही दर कमी आहे. बाजरीला १५२५ ते १६००, हरभऱ्याला ४००० ते ४५५०, मुगाला ५१०० ते ७०००, मठाला ५०००, लाल मिरचीला ३००० ते १२६१०, सोयाबीनला ४ हजार ते ५३१० रुपयाचा दर मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com