Agriculture news in Marathi Inconvenience as Aadhaar registration center is closed | Agrowon

आधार नोंदणी केंद्र बंद असल्याने गैरसोय

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 जुलै 2020

जळगाव ः गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनामुळे लॉकडाउनचा मोठा फटका बसला आहे. अनलॉक सुरू असूनही अद्याप आधार नोंदणी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांसह बॅंक ग्राहकांची गैरसोय होत आहे.

जळगाव ः गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनामुळे लॉकडाउनचा मोठा फटका बसला आहे. अनलॉक सुरू असूनही अद्याप आधार नोंदणी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांसह बॅंक ग्राहकांची गैरसोय होत आहे.

अनेकांचे आधार कार्ड नोंदणी अपडेट नसल्याने गरजूंना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात आधार नोंदणी केंद्रे सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मध्यंतरी या बाबत काही दिवसांपूर्वी प्रशासनाला केंद्रचालकांनी आधार नोंदणी सुरू करण्याबाबत निवेदन दिले होते. परंतु कार्यवाही झालेली नाही. जिल्ह्यात अनेक आधार नोंदणी केंद्रातील चालकांना किटसह इतर साहित्य देखील पुरविण्यात आले आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून अद्याप हिरवा कंदील मिळत नसल्याने आधार नोंदणी पासून अनेक जण वंचित आहेत. एका तालुक्‍यात फक्त तीन ते चार केंद्रे सुरू आहेत. ग्रामीण भागातील काम तर ठप्पच आहे. आधार नोंदणी केंद्र नोंदणीस नियमांचे पालन करून सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.

केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून चार वर्षापूर्वी जनधन खाते सुरू केले होते. झिरो बॅलन्सच्या खात्यात अनेकांनी व्यवहार सुरळीत केले. काहींच्या खात्याशी आधार अपडेट नसल्याने खात्याशी अनेक बॅंक ग्राहकांची पैसे काढण्यासाठी समस्या निर्माण होत आहे.

आधार नोंदणीत जन्मतारीख अपूर्ण, चुकीचे व अपूर्ण नाव, मराठी व इंग्रजी नावात स्पेलिंगमध्ये बदल, मोबाईल नंबर लिंक नसणे यामुळे थम ठेवून पैसे काढणे अडचणीचे झाले आहे. विविध तालुक्‍यांच्या ठिकाणासह ग्रामीण भागात आधारसंबंधी सेवा देणारी केंद्रे वाढविण्याची गरज आहे. कारण अंगणवाडी, शाळा, शेतकरी सन्मान योजना, बॅंक लिकिंग खाते उघडणे व इतर शासकीय कामाकरिता आधार कार्ड  गरजेचे, ते अद्ययावत असावे लागते.


इतर बातम्या
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया... नगर   ः जोमात असलेल्या खरीप...
सोलापुरात खते उपलब्धता पुरेशी, दरवाढीचा...सोलापूर   ः सोलापूर जिल्ह्यात जूनअखेर...
सातारा जिल्ह्यात जाणवतेय युरियाची टंचाई सातारा   ः खरीप हंगामाकरिता रासायनिक...
पुणे जिल्ह्यात अनावश्यक खते खरेदी ...पुणे  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतांची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना...
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
नवापूर तालुक्यात भातासह कापूस, ज्वारीची...नवापूर, जि.नंदुरबार  ः नवापूर तालुक्यात...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
गुणपत्रिकेवर कोविड १९ उल्लेख ...मुंबई: कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
सारंगखेडा प्रकल्पाग्रस्तांना मोबदल्याची...नंदुरबार  ः जिल्ह्यात तापी नदीवरील सारंगखेडा...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
रेल्वेस्थानकावर नागपुरी संत्रा विक्रीला...वर्धा ः नागपूर हे मध्य भारतातील महत्त्वाचे...