Agriculture news in marathi Inconvenience of flood affected farmers due to lack of internet | Page 2 ||| Agrowon

रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची इंटरनेटअभावी गैरसोय

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 जुलै 2021

रत्नागिरी जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. चिपळूण, खेड, गुहागरसह रत्नागिरीतील गावांमध्ये इंटरनेट नसल्याने नुकसान झालेल्या बाधितांचा संपर्क होत नाही.

रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. चिपळूण, खेड, गुहागरसह रत्नागिरीतील गावांमध्ये इंटरनेट नसल्याने नुकसान झालेल्या बाधितांचा संपर्क होत नाही.

त्यांच्यासाठी इफ्को-टोकियो विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी ऑफलाइन सुविधा दिली आहे. रत्नागिरीत वेगळे कार्यालय नाही; मात्र जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात विमा प्रतिनिधींसाठी वेगळा कक्ष सुरू करून देण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, गुहागर, रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागात नदी किनारी असलेली भातशेती वाहून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार एक हजार हेक्टर भातशेती वाहिली आहे.

जिल्ह्यात यंदा पीकविमा योजनेंतर्गत ३ हजार ६०० शेतकऱ्यांनी ७ हजार हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरवला आहे. नदी किनारी भाग वगळता अन्य ठिकाणी शेतीची स्थिती चांगली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका चिपळूण तालुक्याला बसला आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात वसलेल्या गावांमध्ये अजूनही रेंजचा पत्ता नाही. काही गावांचा संपर्कच तुटलेला आहे. या परिस्थितीमध्ये तेथील बाधित शेतकऱ्यांचा संपर्क होऊ शकत नाही. रस्ते, पूल खचल्यामुळे तालुक्यातील मुख्य कार्यालयाशींही संपर्क करता येत नाही. तेथील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे वेळेत करणे हे विमा प्रतिनिधींसाठी आव्हानच ठरणार आहे. पूर ओसरला असला तरीही संपर्क यंत्रणा कोलमडलेलीच आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पीकविमा कार्यालय स्वतंत्र नाही. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात वेगळा कक्ष उभारण्यात आला आहे. नऊ तालुक्यांत प्रत्येकी एक प्रतिनिधी नेमण्यात आला आहे. इंटरनेट नसल्यामुळे विमा प्रतिनिधींशी संवाद साधणे शक्य झालेले नाही.

प्रतिक्रिया
जिल्ह्यातील ४५ शेतकऱ्यांनी आतापर्यंत विमा परतव्यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे. इंटरनेट नसलेल्या भागातील शेतकऱ्यांसाठी ऑफलाइन सुविधा ठेवली आहे. अर्ज भरल्यानंतर त्वरित घटनास्थळी जाऊन पंचनामे करण्याचे काम आमचे प्रतिनिधी करणार आहेत.
-प्रवीण रेवणे, विमा प्रतिनिधी, इफ्को-टोकियो 

प्रतिक्रिया
मुसळधार पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. यंदा विमा उतरवला होता. या बाबत ऑनलाइन अर्ज केल्यानंतर विमा प्रतिनिधी पंचनाम्यासाठी आले होते. निकषानुसार नुकसान झालेल्या शेतीची भरपाई मिळेल, असे त्यांनी सांगितले.

- राजाराम जयराम चव्हाण, हरचिरी, रत्नागिरी


इतर बातम्या
सौरऊर्जा पंप योजनेचे संकेतस्थळ डाउनऔरंगाबाद : सौरऊर्जेद्वारे कृषिपंप...
मराठवाड्यात पाऊस सुरूच; सोयाबीन, कपाशी...औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा कमी अधिक प्रमाणात...
तंत्रज्ञान प्रसारामध्ये ‘केव्हीके’चा...सोलापूर ः ‘‘तंत्रज्ञान प्रसारामध्ये सोलापूर कृषी...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...