जैविक खते वापरून कृषी उत्पादन वाढवावे : पडवळ

नाशिक : द्रवरूप जैविक खताची बियाण्यास बीजप्रक्रिया, ठिबक सिंचनाव्दारे शेणखतातून द्रवरूप जैविक खताचा वापर केल्यास त्याचा उत्पादन वाढीवर नक्कीच परिणाम दिसून येईल. त्यामुळे जैविक खते वापरावीत’’, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ यांनी केले.
Increase agricultural production using organic fertilizers: Padwal
Increase agricultural production using organic fertilizers: Padwal

नाशिक : द्रवरूप जैविक खताची बियाण्यास बीजप्रक्रिया, ठिबक सिंचनाव्दारे शेणखतातून द्रवरूप जैविक खताचा वापर केल्यास त्याचा उत्पादन वाढीवर नक्कीच परिणाम दिसून येईल. त्यामुळे जैविक खते वापरावीत’’, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ यांनी केले.  

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून ''विकेल ते पिकेल'' अंतर्गत १० टक्के रासायनिक खताची बचत होण्यासाठी बायोला या नत्र-स्फुरद- पालाशयुक्त द्रवरूप जैविक खताचे महिला शेतकऱ्यांना पडवळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शेरुळ येथील संगीता पाटील, नरडाने येथील अनिता परदेशी, सुलोचना वाघ या महिलांनी प्रतिनिधीक स्वरूपात ही खते स्वीकारली. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तंत्र अधिकारी गोकूळ अहिरे, आदित्य कृषी सेवा केंद्राचे दीपक मालपुरे आदी उपस्थित होते.

पडवळ म्हणाले, ‘‘बायोला जैविक खत हे बीजप्रक्रियेसाठी २५ मिली प्रतिकिलो बियाणे, रोपे लागवडीसाठी १५ मिली प्रतिलिटर पाण्यात रोपे ३० मिनिटे बुडविणे, फळबागांसाठी १० मिली प्रतिलिटर पाणी घेऊन फळ झाडांच्या मुळाशी ड्रेंचिंग करणे तसेच ठिबक सिंचनाव्दारे १२०० मिली  बायोला प्रति २०० लिटर पाणी प्रतिएकर वापरण्याबाबत शिफारस आहे. मात्र जैविक खत हे रासायनिक खते, कीटकनाशक किंवा बुरशीनाशक यांच्या सोबत वापरु नये.’’ 

  ‘उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ’ 

‘‘बायोला जैविक खत वापरल्याने हवेतील नत्र, स्फुरद व जमिनीतील पालाश पिकांना उपलब्ध होण्यास मदत होते’’, अशी माहिती देवरे यांनी दिली. ‘‘रासायनिक खतांची बचत होऊन कृषी उत्पादनात किमान १० ते १५ टक्के वाढ होते. जैविक खताचा वापर करून उत्पादन वाढवावे’’, असे आवाहन देवरे यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com