सांगली जिल्ह्यात तुरीच्या पेरणी क्षेत्रात वाढ

जिल्ह्यात गतवर्षी परतीचा झालेला पाऊस आणि यंदा वेळेत उन्हाळी पाऊस यामुळे तूर पिकाची वेळेत पेरणी झाली आहे. जिल्ह्यात गतवर्षी सुमारे ६ हजार ५०० हेक्टर तुरीचे क्षेत्र होते. यंदाच्या हंगामात हे क्षेत्र ३९५५ हेक्टरने वाढून १० हजार ४५५ हेक्टर इतके झाले आहे.
Increase in area under turi in Sangli district
Increase in area under turi in Sangli district

सांगली : जिल्ह्यात गतवर्षी परतीचा झालेला पाऊस आणि यंदा वेळेत उन्हाळी पाऊस यामुळे तूर पिकाची वेळेत पेरणी झाली आहे. जिल्ह्यात गतवर्षी सुमारे ६ हजार ५०० हेक्टर तुरीचे क्षेत्र होते. यंदाच्या हंगामात हे क्षेत्र ३९५५ हेक्टरने वाढून १० हजार ४५५ हेक्टर इतके झाले आहे. सध्या पिकास पोषक वातावरण असल्याने पिकांची चांगली वाढ होऊ लागली आहे.

जिल्ह्यात प्रामुख्याने जत तालुक्यात तुरीची पेरणी होते. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षात अपेक्षित पाऊस नसल्याने जत तालुक्यासह जिल्ह्यातील तूर पिकाच्या क्षेत्रात मोठी घट झाली होती. सन २०१७ मध्ये जिल्ह्यात ६ हजार ८८० हेक्टरवर तुरीचा पेरा झाला होता. सन २०१८ मध्ये ७ हजार ५२० क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती. परंतु या दोन वर्षात अपेक्षित पाऊस नसल्याने तुरीच्या उत्पादनात देखील घट झाली होती.

त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता.गतवर्षी डिसेंबर अखेर दुष्काळी पट्ट्यात पाऊस होता. त्यानंतर उन्हाळ्यात देखील अपेक्षित पाऊस झाला. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांनी वेळेत मशागती सुरू करून तुरीची पेरणी केली. आगाप पेरणी केलेल्या तूर पिकांची अवस्था फुळकळीत असून उशिरा पेरा झालेल्या पिकांची चांगली वाढ होत आहे. सध्या सर्वदूर अधूनमधून पाऊस पडत असल्याने बळीराजा सुखावला आहे. तूर पिकास पोषक वातावरण असल्याने पिकाची वाढ चांगली होत आहे.

जत तालुक्यात सर्वाधिक पेरा कोरडवाहू पट्ट्यात तूर पीक प्रामुख्याने घेतले जाते. परंतु जत तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यात सर्वाधिक पेरा झाला आहे.

तालुकानिहाय तुरीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका क्षेत्र
मिरज ९५
जत ७७५१
खानापूर ७६०
वाळवा १२६
तासगाव ७८२
आटपाडी १२४
कवठेमहांकाळ १७४
कडेगाव ६४१
एकूण १०४५५

यावर्षी अपेक्षित पाऊस झाला आहे. त्यामुळे तुरीचा पेरा वाढला आहे. सध्या तूर पिकास पोषक वातावरण असल्याने वाढदेखील चांगली होत आहे. असेच वातावरण राहिल्या उत्पादनात वाढ होईल. - सुरेश मगदूम, कृषी उपसंचालक, सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com