नाशिकमध्ये आल्याच्या आवकेत वाढ, दरातही सुधारणा

नाशिकमध्ये आल्याच्या आवकेत वाढ, दरातही सुधारणा
नाशिकमध्ये आल्याच्या आवकेत वाढ, दरातही सुधारणा

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात आल्याची आवक १२४ क्विंटल झाली. त्यास १०००० ते १५००० प्रतिक्विंटल असा दर मिळाला. मागील सप्ताहात आल्याची आवक ९५ क्विंटल झाली होती. त्यास ११५०० ते १३००० प्रतिक्विंटल दर मिळाला होता. त्यामुळे आल्याच्या आवकेत वाढ झाली, तसेच दरात सुधारणा झाल्याची माहिती माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

चालू सप्ताहामध्ये उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटल्याचे दिसून आले. आवक ४६५९ क्विंटल झाली. बाजारभाव २००० ते ३२५१ प्रतिक्विंटल होते. परपेठेत मागणी वाढल्याने बाजारभाव वाढल्याचे दिसून होते. मात्र, मागील सप्ताहाच्या तुलनेत दरात घसरण झाल्याचे दिसून आले. बटाट्याची आवक ९७६० क्विंटल झाली. बाजारभाव ५०० ते १३००  प्रतिक्विंटल होते.

लसणाची आवक १२४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६००० ते १६००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी तर काहींची आवक जास्त झाल्याने बाजारभावसुद्धा कमी-जास्त निघाले. वालपापडी घेवड्याची आवक ५४५७ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ४०००ते ५००० दर मिळाला, तर घेवड्याला ५००० ते ६००० प्रतिक्विंटल दर मिळाला. हिरव्या मिरचीची आवक ९७७ क्विंटल झाली. परपेठेत मागणी कमी असल्याने बाजारभावात घट झाली. 

लवंगी मिरचीला १७०० ते २५०० तर ज्वाला मिरचीला १५०० ते २५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. वाटाण्याची आवक ५५ क्विंटल झाली. चालू सप्ताहात वाटण्याची आवक घटली असून, बाजारभावात वाढ झाली. त्यास १५५०० ते १७०००  प्रतिक्विंटल दर मिळाला. वाटण्याची आवक घटली असून, बाजारभावात वाढ झाली आहे. चालू सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी जास्त झाल्याने बाजारभावातसुद्धा चढउतार दिसून आले. फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ३०० ते ९००, वांगी २५० ते ४५०, फ्लॉवर १३५ ते ३६० असे प्रति १४ किलोस दर मिळाले. तर कोबी ११० ते २१० असा प्रति २० किलोस दर मिळाला. 

ढोबळी मिरची २७० ते ६०० असा प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा २७० ते ५००, कारले ११० ते १७०, गिलके २४० ते ३५०, भेंडी २४० ते ३८५ असे प्रति १२ किलोस दर मिळाले. तर काकडीला १०० ते १६०, लिंबू ३०० ते ७००, दोडका १५० ते ३५० असे प्रति २० किलोस दर मिळाले. 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर ३५० ते ११५००, मेथी १४०० ते ४४००, शेपू ३६० ते १९००, कांदापात १५०० ते ४०००, पालक १७० ते ३००, पुदिना १०० ते २९० असे प्रति १०० जुड्यांना दर मिळाले.  फळांमध्ये चालू सप्ताहात डाळिंबाची आवक ६८४६ क्विंटल झाली. आवक कमी झाली असून, परपेठेत मागणी वाढल्याने बाजारभाव स्थिर आहेत. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ५०० ते ५५०० व मृदुला वाणास ४५० ते ४७५० प्रतिक्विंटल दर मिळाला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com