मृदा, जलव्यवस्थापनाबाबत जागरूकता वाढवावी ः डाॅ. इंगोले

मृदा, जलव्यवस्थापनाबाबत जागरूकता वाढवावी ः डाॅ. इंगोले
मृदा, जलव्यवस्थापनाबाबत जागरूकता वाढवावी ः डाॅ. इंगोले

परभणी ः ‘‘शेतकरी शेतीशाळा समन्वयक आणि प्रशिक्षकांनी शेतकऱ्यांमध्ये मृदा आणि जलव्यवस्थापन तसेच कीड व रोग व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत. कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या संर्पकात राहून शेतकऱ्यांमध्ये अद्यायावत कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यावर भर देणे गरजेचे आहे’’, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डाॅ. प्रदीप इंगोले यांनी केले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालय, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यातर्फे शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात येणाऱ्या हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळाचे समन्वयक आणि प्रशिक्षक यांच्यासाठी सोमवार (ता. २९) ते शनिवार (ता. ४ मे) या कालावधीत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्‌घाटन डाॅ. इंगोले यांच्या हस्ते झाले.

या वेळी मृदा व कृषी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डाॅ. सय्यद इस्माईल, आत्माचे प्रकल्प उपसंचालक के. आर. सराफ, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डाॅ. प्रशांत देशमुख, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे प्रमुख डाॅ. यू. एन. आळसे, पी. एस. चव्हाण, पोकराचे श्री. बनसोडे आदी उपस्थित होते.

दररोज ‘अॅग्रोवन’ वाचावा वनामकृविचे विस्तार शिक्षण संचालक डाॅ. प्रदीप इंगोले म्हणाले, ‘‘कृषी विद्यापीठाप्रमाणेच दैनिक अॅग्रोवनदेखील शेतकऱ्यांमध्ये कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करून कृषी विस्ताराचे कार्य अत्यंत प्रभावीपणे करत आहे. त्यामुळे प्रत्येक शेतीशाळा प्रशिक्षकाने विद्यापीठाच्या कृषी दैनंदिनी सोबत दररोज ‘अॅग्रोवन’चे वाचन करून आपले ज्ञान अद्ययावत करावे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com