Agriculture news in marathi Increase in brinjal and tomato imports in Kolhapur | Agrowon

कोल्हापुरात वांगी, टोमॅटोच्या आवकेत वाढ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जून 2020

कोल्हापूर : येथील बाजार समितीत वांगी, टोमॅटो, ओल्या मिरचीच्या आवकेत वाढ झाली. वांग्यांना दहा किलोस शंभर ते साडेतीनशे रुपये इतका दर मिळाला.

कोल्हापूर : येथील बाजार समितीत वांगी, टोमॅटो, ओल्या मिरचीच्या आवकेत वाढ झाली. वांग्यांना दहा किलोस शंभर ते साडेतीनशे रुपये इतका दर मिळाला. टोमॅटोची तीन ते साडेतीन हजार कॅरेट इतकी आवक कोल्हापूरच्या पूर्व भागाबरोबरच सांगली जिल्ह्यातून झाली. 

टोमॅटोस दहा किलोस १०० ते २५० रुपये दर होता. टोमॅटोची आवक या सप्ताहात काही प्रमाणात वाढली. ओल्या मिरचीस दहा किलोस २०० ते ३५० रुपये इतका दर मिळाला. घेवड्याच्या आवकेत घट कायम राहिली. घेवड्यास दहा किलोस ४५० ते ५०० रुपये इतका दर होता.

गवारीची वाढलेली आवक या सप्ताहातही कायम राहिली. गवारीस दहा किलोस ३०० ते ५०० रुपये इतका दर होता. भेंडीची आवक ही वाढलेली होती. भेंडीला दहा किलोस १०० ते २५० रुपये इतका दर मिळाला. भेंडीची दररोज ९०० ते १००० करंड्या आवक झाली.
दोडका, काकडीची वाढलेली आवक या सप्ताहात कायम होती.

दोडक्यास दहा किलोस १५० ते ४००, काकडीस दहा किलोस १०० ते २०० रुपये इतका दर होता. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची आवक वाढली.  कोथिंबीरिस शेकडा पाचशे ते एक हजार रुपये इतका दर मिळाला. ओल्या भुईमूग शेंगांही बाजार समितीत दाखल होत असून त्यांना दहा किलोस २०० ते ३५० रुपये इतका दर होता.

शेवगा शेंगेची दररोज चारशे ते पाचशे पोती आवक झाली. त्यांना दहा किलोस २०० ते ४५० रुपये इतका दर होता.  फळांमध्ये डाळिंबांची दररोज २०० ते ३०० कॅरेट इतकी आवक होती. त्यांना किलोस १५ ते २५ रुपये इतका दर होता.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...